'RSSचे पंतप्रधान भारतमातेशी खोटे बोलत आहेत'

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली : देशात निर्वासितांसाठी एकही छावणी (डिटेंशन सेंटर) सुरु नाही, असे वक्तव्य करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) पंतप्रधान असेही म्हटले आहे.

रविवारी दिल्लीतील रामलिला मैदानात झालेल्या  धन्यवाद रॅलीत पंतप्रधान मोदींनी नागरिकत्व कायदा (सीएए) आणि एनआरसीवरून वक्तव्य केले होते. मोदींनी काँग्रेससह शहरी नक्षलवादी अफवा पसरवून नागरिकांना भडकवत असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी देशात निर्वासितांसाठी एकही छावणी नसल्याचेही म्हटले आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसने त्यांना व्हिडिओ प्रसिद्ध करून लक्ष्य केले आहे.

'बीबीसी'ने आसाममधील डिटेंशन सेंटरबाबत व्हिडिओ केला आहे. आसाममध्ये सुरु असलेल्या डिटेंशन सेंटरचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी प्रसिद्ध करत आरएसएसचे पंतप्रधान भारतमातेशी खोटे बोलत आहेत, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी #JhootJhootJhoot हा हॅशटॅगही दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com