पंतप्रधान मोदींकडून फडणवीस, अजित पवारांना शुभेच्छा

वृत्तसंस्था
Saturday, 23 November 2019

मोदींनी शुभेच्छा देताना म्हटले आहे, की या दोघांनी शपथ घेतल्याने मी त्यांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे दोन्ही नेते चांगले काम करतील असा मला विश्वास आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्याने मी त्यांचे अभिनंदन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राजभवनात आज (शनिवार) राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र आल्याचे यावरून तरी दिसत आहे. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या. अजित पवार यांच्यासोबत बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हेही उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

मोदींनी शुभेच्छा देताना म्हटले आहे, की या दोघांनी शपथ घेतल्याने मी त्यांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे दोन्ही नेते चांगले काम करतील असा मला विश्वास आहे.

अजित पवारांनी आमच्यासोबत यायचा निर्णय घेतला : फडणवीस

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास रथ वेगाने पुढे जाईल हा ठाम विश्वास आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi congratulate Devendra Fadnavis and Ajit Pawar