स्थिर सरकारसाठी घेतला निर्णय : अजित पवार
महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. शिवसेनेसोबत चर्चा संपतच नव्हती. त्यामध्ये नको त्या गोष्टीची मागणी वाढत चालली होती. राज्याला स्थिर सरकार मिळण्यासाठी यासाठी हा निर्णय मी घेतला, असे अजित पवार यांनी सांगितले.
मुंबई : राज्यात खिचडी सरकार बनू नये यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमच्यासोबत यायचा निर्णय घेतला. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Maharashtra needed stable govt, not 'khichdi' govt, says Devendra Fadnavis after taking oath as Chief Minister
Read @ANI Story | https://t.co/TTdK2AFGLP pic.twitter.com/mJsJYbS87f
— ANI Digital (@ani_digital) November 23, 2019
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
राजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र आल्याचे यावरून तरी दिसत आहे. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या.
#WATCH Mumbai: NCP's Ajit Pawar takes oath as Deputy CM, oath administered by Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan. pic.twitter.com/TThGy9Guyr
— ANI (@ANI) November 23, 2019
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री
फडणवीस म्हणाले, की जनादेश आम्हाला महायुती म्हणून मिळाले होते. आम्ही एकमेकांना काय वचन दिले हे पाहण्यापेक्षा जनतेला दिलेले वचन महत्त्वाचे आहे. आमच्यासोबत येण्यापेक्षा दुसऱ्यासोबत जाणार असल्याने आम्हाला हा निर्णय घेतला. मी मोदी, अमित शहा यांचे आभार मानतो.