esakal | इस्रायलच्या नव्या पंतप्रधानांना मोदींनी दिल्या सदिच्छा; नेतन्याहूंना म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

इस्रायलच्या नव्या पंतप्रधानांना मोदींनी दिल्या सदिच्छा; नेतन्याहूंना म्हणाले...

इस्रायलच्या नव्या पंतप्रधानांना मोदींनी दिल्या सदिच्छा; नेतन्याहूंना म्हणाले...

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : इस्रायलमध्ये सरतेशेवटी बेंजामिन नेतन्याहू यांची राजवट संपुष्टात आली आहे. जवळपास एक दशक त्यांनी इस्रायलचं नेतृत्व केलं. मात्र, आता उजव्या विचारसरणीच्या यामिना पक्षाचे नेते नेफ्टाली बेनेट यांनी काल रविवारी इस्रायलच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या या शपथविधीसह बेंजामिन नेतन्याहू यांचा 12 वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी स्पेशल फोर्सचे कमांडो राहिलेल्या बेनेट यांना इस्रायलचे पंतप्रधान झाल्याबद्दल सदिच्छा दिल्या आहेत. सोबतच पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे आभार देखील मानले आहेत. (PM Narendra Modi Congratulates New Israel PM Naftali Bennett Gratitude To Benjamin Netanyahu)

हेही वाचा: 'तुम्ही खुनी आहात का?'; पत्रकाराचा पुतिन यांना थेट प्रश्न

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान झालेल्या यामिना पक्षाचे नेते नेफ्टाली बेनेट यांना आज सोमवारी सदिच्छा दिल्या. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, इस्रायलचे पंतप्रधान बनल्याबद्दल नेफ्टाली बेनेट यांना खूप साऱ्या सदिच्छा. आपण पुढच्या वर्षी आपल्या राजनैतिक संबंधाच्या प्रगतीची 30 वर्षे साजरी करणार आहोत, त्यामुळे मी आपणास भेटम्यास तसेच दोन्ही देशांमधील राजनैतिक भागीदारी अधिक दृढ करण्यास उत्सुक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेंजामिन नेतन्याहू यांचेदेखील आभार मानले आहेत. त्यांनी म्हटलंय की, इस्रायचे पंतप्रधान म्हणून तुम्ही यशस्वीरित्या आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे. भारत-इस्रायल राजनैतिक भागीदारीवर वैयक्तीक लक्ष देण्याबदद्ल मी त्यांचे आभार मानतो.

हेही वाचा: नेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; 12 वर्षांनी नेतान्याहू पायउतार

इस्रायलच्या 120 सदस्यीय संसद नेसेटमध्ये नव्या सरकारवर रविवारी झालेल्या मतदानामध्ये 60 सदस्यांनी त्यांच्या बाजूने तर 59 सदस्यांनी विरोधात मतदान केलं. या दरम्यान एक सदस्या अनुपस्थित होता. नव्या सरकारमध्ये 27 मंत्री आहेत, ज्यामध्ये 9 महिला आहेत. हे नवे सरकार म्हणजे वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांनी एकत्रित येऊन साकारलेली आघाडी आहे. यामध्ये उजवे, डावे तसेच मध्यममार्गी पक्षांसोबतच अरब समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका पक्षाचा देखील समावेश आहे. येश एतिद पक्षाच्या मिकी लेवी यांनी संसदेमध्ये स्पीकर पदावर निवडलं गेलं आहे. त्यांच्या बाजूने 67 जणांनी मतदान केलं आहे.

loading image
go to top