ModiWithAkshay : मोदी अक्षयला म्हणाले, मला राग येतो, पण कोणाचा अपमान करत नाही

वृत्तसंस्था
बुधवार, 24 एप्रिल 2019

लहानपणापासून वाचनाचा छंद आहे.  मलाही आंबे खाण्याची आवड आहे. लहानपणी शेतात जाऊन झाडावर पिकलेले आंबे खाणे आवडत असे. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे माझे कुटुंबीय नव्हते. त्यामुळे कधीच पंतप्रधान होईल, असे वाटले नव्हते. गुलामनबी आझाद यांच्यासारखे विरोधी पक्षातही माझे अनेक मित्र आहेत. ममता बॅनर्जी मला अनेक वर्षे कुर्ते भेट देत होत्या. 

नवी दिल्ली : मी खूप तरुण वयात घर सोडले. तरुणपणी सैन्यात जाण्याची इच्छा होती. पंतप्रधान होईन असे कधीच वाटले नव्हते. सामान्य नागरिकांच्या डोक्यात कधीच हा विचार येत नाही. माझी ही कौटुंबिक परिस्थिती आहे, त्यानुसार मला छोटी नोकरी लागली असती तरी आईने गावात गूळ वाटला असता. मी कोणाचा अपमान करत नाही. मला राग येते पण कधी व्यक्त करत नाही, अशी कबुली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॉलिवूडमधील खिलाडी अशी ओळख असलेल्या अक्षय कुमारने मुलाखत घेतली. मोदी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल हे सर्व प्रश्न होते. त्यांनी अगदी लहानपणापासून पंतप्रधानपदापर्यंतच्या सर्व आठवणींना या मुलाखतीतून उजाळा दिला. 

मोदींनी उत्तरे देताना म्हटले, की लहानपणापासून वाचनाचा छंद आहे.  मलाही आंबे खाण्याची आवड आहे. लहानपणी शेतात जाऊन झाडावर पिकलेले आंबे खाणे आवडत असे. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे माझे कुटुंबीय नव्हते. त्यामुळे कधीच पंतप्रधान होईल, असे वाटले नव्हते. गुलामनबी आझाद यांच्यासारखे विरोधी पक्षातही माझे अनेक मित्र आहेत. ममता बॅनर्जी मला अनेक वर्षे कुर्ते भेट देत होत्या. मला पंतप्रधान झाल्यानंतर इतर पंतप्रधानांपेक्षा जास्त अनुभव होता. कारण, मी अनेकवर्षे मुख्यमंत्री राहिलेलो आहे. माझे अनेक मित्र मला सांगतात, तुम्ही जास्त वेळ झोप घ्या. ओबामांनीही मला हे सांगितले होते. पण, माझ्यात कामाची नशा आहे. त्यामुळे माझी जीवनशैलीच तशी झाली आहे. लहानपणी संघाच्या शाखेत विविध खेळ खेळलो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi in conversation with Akshay Kumar