पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी काँग्रेसला  'हा'  सल्ला दिला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

मोदी म्हणाले ;पाकिस्तानातून आलेले हिंदू, दलित बंधू भगिनींचे रक्षण करण्याची आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे. 

बंगळूर : दहशतवादाविरोधात भारत कार्य करीत आहे. त्यासाठीच काश्‍मीरमधून ३७० कलम हटवून तेथील अनिश्‍चितता आणि दहशत कमी करण्यात आली आहे. संसदेच्या विरोधात टीका करण्याचे सोडून पाकिस्तानातून आलेल्या दलित, पीडित आणि शोषितांच्या बाजूने घोषणा देत त्यांच्यासाठी आंदोलन करून दाखवा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना दिला.

तुमकूरमधील सिद्धगंगा मठात गुरुवारी (ता. २) डॉ. शिवकुमार स्वामी वास्तू संग्रहालयाच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा समाचार घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘तुम्हाला घोषणाबाजीच करायची असेल, तर पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याच्याराच्या विरोधात घोषणा द्या. मिरवणुका काढायच्या असतील, तर पाकिस्तानातून आलेल्या दलित, शोषितांच्या बाजूने आंदोलने करा. पाकिस्तानच्या कुरापतींविरोधात आंदोलने करायचे सोडून नागरिकत्व कायद्याविरोधात विरोधी पक्षांनी आंदोलन सुरू केले आहे. 

हेही वाचा - सोलापुरात शिवसैनिकाने सुरु केले स्वखर्चाने शिवभोजन -

‘काही आठवड्यांपूर्वी संसदेत नगरिकत्व कायदा संमत झाला. पण, काँग्रेस आणि काँग्रेसप्रणित संस्था संसदेच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. पाकिस्तानाचा जन्म धर्माच्या आधारावर झाला आहे. त्याच्या जन्मापासूनच इतर धर्मीयांवर अत्याचार केले जात आहेत. त्यामुळेच ते लोक भारतात आश्रयासाठी आले. पण, पाकिस्तानविरोधात काँग्रेस काही बोलत नाही. पाकिस्तानातील अल्पसंख्याक लोकांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत बोलण्यास त्यांच्याकडे वेळ नाही. त्यांच्या तोंडी कुलुप का लागले?’ असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केला. 

मदत करणे नागरिकांचे कर्तव्य

मोदी पुढे म्हणाले, ‘शरणार्थींची मदत करणे देशातील नागरिकांचे कर्तव्य आहे. पाकिस्तानातून आलेले हिंदू, दलित बंधू भगिनींचे रक्षण करण्याची आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची दुष्कृत्ये समोर आणणे आज गरजेचे आहे. आंदोलन करायचेच असल्यास पाकिस्तानात मागील ७० वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात करा. शेजारील देशातील शरणार्थींचा सन्मान करण्याचे कार्य भारत करीत आहे.’

वाचा कोणी दिला इशारा. बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

पंतप्रधान मोदींकडून विरोधकांचा समाचार

तुमकूरमधील सिद्धगंगा मठात गुरुवारी (ता. २) डॉ. शिवकुमार स्वामी वास्तू संग्रहालयाच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा समाचार घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘तुम्हाला घोषणाबाजीच करायची असेल, तर पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याच्याराच्या विरोधात घोषणा द्या. मिरवणुका काढायच्या असतील, तर पाकिस्तानातून आलेल्या दलित, शोषितांच्या बाजूने आंदोलने करा. पाकिस्तानच्या कुरापतींविरोधात आंदोलने करायचे सोडून नागरिकत्व कायद्याविरोधात विरोधी पक्षांनी आंदोलन सुरू केले आहे. 

 हेही वाचा - मंत्रिमंडळ खातेवाटप : कुणाला कोणतं खातं? वाचा पहिली यादी

 पीडितांच्या अत्याचारावर बोला

‘काही आठवड्यांपूर्वी संसदेत नगरिकत्व कायदा संमत झाला. पण, काँग्रेस आणि काँग्रेसप्रणित संस्था संसदेच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. पाकिस्तानाचा जन्म धर्माच्या आधारावर झाला आहे. त्याच्या जन्मापासूनच इतर धर्मीयांवर अत्याचार केले जात आहेत. त्यामुळेच ते लोक भारतात आश्रयासाठी आले. पण, पाकिस्तानविरोधात काँग्रेस काही बोलत नाही. पाकिस्तानातील अल्पसंख्याक लोकांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत बोलण्यास त्यांच्याकडे वेळ नाही. त्यांच्या तोंडी कुलुप का लागले?’ असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केला. 

पाकिस्तानविरोधात आंदोलने करा
मोदी पुढे म्हणाले, ‘शरणार्थींची मदत करणे देशातील नागरिकांचे कर्तव्य आहे. पाकिस्तानातून आलेले हिंदू, दलित बंधू भगिनींचे रक्षण करण्याची आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची दुष्कृत्ये समोर आणणे आज गरजेचे आहे. आंदोलन करायचेच असल्यास पाकिस्तानात मागील ७० वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात करा. शेजारील देशातील शरणार्थींचा सन्मान करण्याचे कार्य भारत करीत आहे.’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi Criticize On Congress Bangalore Marathi News