पंतप्रधान मोदींची 'नागरिकत्त्व'च्या मुद्द्यावर काँग्रेसवर टीका; म्हणाले...

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 जानेवारी 2020

- पंतप्रधान मोदी कर्नाटकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर

नवी दिल्ली : काँग्रेस पाकिस्तानच्या विरोधात नाही. तर तेथून भारतात आलेल्या पीडित शरणार्थींच्या विरोधात आंदोलन करत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान मोदी कर्नाटकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून, तुमकुरूच्या श्री सिद्धगंगा मठ येथे पोहोचले आहेत. येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते. त्यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

ते म्हणाले, पाकिस्तानातून आलेल्या दलित, मागासवर्गीय आणि अन्याग्रस्तांविरोधात विरोधकांकडून आंदोलन केले जात आहे. पाकिस्तानात हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन समाजातील लोकांवर सातत्याने अत्याचार होत राहिला आहे.

खातेवाटपाचा घोळ संपेना! 

तसेच तेथील लाखो लोकांना आपले घर सोडून भारतात यावे लागले. पाकिस्तानने या लोकांवर अत्याचार केला. मात्र, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष पाकिस्तानविरोधात नाहीतर या पीडितांविरोधातच आंदोलन केले जात आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi Criticizes on Congress on CAA Issue