"मोदींमध्ये शेतकऱ्यांशी आमने-सामने चर्चा करण्याची हिंमत नाही का?"

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 25 December 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांना संबोधित केले.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांना संबोधित केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे टाकल्याचे जाहीर केले. पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर विरोधी पक्ष काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. त्यांचे आंदोलन सुरु आहे, पण मोदी त्यांचा सन्मान करत नाहीत. 

मध्य प्रदेश सोडा, नाहीतर जमिनीत गाडेन; मुख्यमंत्र्यांनी दिली धमकी?

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आमने-सामने चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये हिंमत नाही. सरकार 18 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचं म्हणते. पण तुम्ही पाहिलं तर हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत. कारण 'मिडलमॅन' उपस्थित आहेत. 

पंतप्रधान मोदी म्हणतात कोणत्याही दलालाशिवाय पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. पण असं नाहीये, हजारो शेतकरी अजूनही वंचित आहेत. 50,000 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातात आणि नंतर त्यांना नोटीस पाठवली जाते की, पैसे परत करा. तुम्हाला चुकून पैसे आले आहेत, असंही चौधरी म्हणाले आहेत. 

तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करता, मग लाखोंच्या संख्येने शेतकरी मोकळ्या आकाशाखाली का बसले आहेत. कायदे रद्द केल्याने आकाश फाटेल काय? 20 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तुम्ही इतके जिद्दी का आहात, असा सवाल अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे. 

बंदी घातलेले ऍप वापरणाऱ्यांना होतो दंड? सरकारने केलं स्पष्ट

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अटल बिहारी वाजपेयीजींच्या जयंत्तीनिमित्त पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत जवळपास 6 राज्यांतील 9 कोटी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी आज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 18 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. यावेळी त्यांनी म्हटलंय की, पश्चिम बंगालमधील 70 लाखांहून अधिक शेतकरी हे या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीयेत. कारण बंगालमधील ममता सरकारच्या राजकारणामुळे हे शेतकरी वंचित राहिलेले आहेत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM narendra modi do not have guts to talk with farmers face to face