मोदी सरकारमधील नवे मंत्री आणि त्यांच्यासमोरील आव्हाने 

modi government
modi government

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही संकटे घोंघावत असताना मार्ग काढावा लागेल. गृह, संरक्षण, कृषी, वाणिज्य आणि शिक्षणासारख्या मंत्रालयांसमोरील आव्हानेही कठीण आहेत. नव्याने स्थापन करण्यात आलेले जलशक्ती मंत्रालय हे सरकारचे वैशिष्ट्य ठरणार आहे. 

अमित शहा : गृहमंत्री 
- घुसखोरीला लगाम घालणे 
- महाराष्ट्रासह सहा राज्यांतील किमान 25 जिल्ह्यांतील नक्षलवाद काबूत आणणे. 
- अंतर्गत सुरक्षा, निमलष्करी दलांमधील खदखदीवर मार्ग काढणे. 
- काश्‍मीरपासून केरळच्या काही भागांतील वाढत्या दहशतवादाची समस्या सोडविणे. 
- "एनआरसी' मार्गी लावणे. 

निर्मला सीतारामन : अर्थमंत्री 
- जागतिक मंदी व कच्च्या तेलाच्या दरांशी सामना करणे. 
- बेरोजगारीच्या संकटावर मात करणे. 
- सकल आर्थिक विकासदर वाढविणे. 
- सरकारी बॅंका व बिगर सरकारी वित्तसंस्थांची अवस्था सुधारणे. 
- बॅंकांच्या विलीनीकरणाला चालना देणे. 
- आर्थिक समन्वयाबरोबरच कृषी क्षेत्राची नाजूक परिस्थिती सुधारणे. 
- थकीत कर्जांची वसुली व रोख रकमेचे प्रमाण वाढविणे. 
- निर्यातवाढचे प्रमाण वाढविणे. 

राजनाथसिंह : संरक्षण 
- "राफेल' करार प्रत्यक्षात आणणे. 
- संरक्षण खरेदी व्यवहारातील पेचावर मार्ग काढणे. 
- "एचएएल'सारख्या संरक्षण संस्थांची स्थिती सुधारणे. 

पीयूष गोयल : रेल्वे 
- लोहमार्गांची वेळेत देखभाल आणि दुरुस्ती. 
- अपघात, दुर्घटनांचे प्रमाण शून्यावर आणणे. 
- मालवाहतुकीतून उत्पन्न वाढविणे. 
- उत्पन्नवाढीसाठी अन्य पर्याय शोधणे. 
- प्रवाशांची सुरक्षा, आधुनिक डब्यांचे उत्पादन वाढविणे. 

एस. जयशंकर : परराष्ट्र 
- शेजारच्या व उपखंडातील देशांबरोबरचे संबंध सुरळीत करणे. 

नरेंद्रसिंह तोमर : कृषी 
- शेतमालाला दुप्पट भाव देणे. 
- ई-बाजारपेठा, दुष्काळी राज्यांना मदत देणे. 

गजेंद्रसिंह शेखावत : जलशक्ती 
- मच्छीमार समुदायाच्या अर्थव्यवस्थेला आकार देणे. 
- राज्याराज्यांतील जलविवाद सोडविणे. 
- पाणीवाटपात शिस्त आणणे. 
- पावसाचे पाणी अडविण्याची सुदृढ व्यवस्था. 

नवे जलशक्ती मंत्रालय 
देशातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे हा या नव्या मंत्रालयाच्या स्थापनेचा मुख्य हेतू आहे. जलस्रोत, नद्यांचे शुद्धीकरण आणि गंगेची स्वच्छता हे विषयही या मंत्रालयांतर्गत आणण्यात आले आहेत. स्वच्छतेचा विषय याच मंत्रालयाच्या अखत्यारित येईल. सर्व नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्याचे आश्‍वासन मोदी यांनी प्रचारादरम्यान दिले होते. हे नवे मंत्रालय त्याची पूर्ती मानले जाते. 

केंद्रीय मंत्रिमंडळ : नव्या मंत्र्यांची खाती 
- पंतप्रधान नरेंद्र मोदी ः कार्मिक, अवकाश, आण्विक ऊर्जा, अणुशक्ती विकास, अवकाश संशोधन 
- राजनाथ सिंह ः संरक्षण 
- अमित शहा ः गृह 
- एस. (सुब्रह्मण्यम) जयशंकर ः परराष्ट्र 
- निर्मला सीतारामन ः अर्थ, कॉर्पोरेट अफेअर्स 
- नितीन गडकरी ः भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग 
- प्रकाश जावडेकर ः पर्यावरण आणि वने, माहिती आणि प्रसारण 
- पीयूष गोयल ः रेल्वे, वाणिज्य उद्योग 
- अरविंद सावंत ः अवजड उद्योग 
- सदानंद गौडा ः रसायने आणि खते 
- रामविलास पासवान ः ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा 
- नरेंद्रसिंह तोमर ः कृषी, ग्रामविकास आणि पंचायत राज 
- रविशंकर प्रसाद ः विधी आणि न्याय, दूरसंचार, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान 
- हरसिमरत कौर बादल ः अन्न प्रक्रिया उद्योग 
- थावरचंद गेहलोत ः सामाजिक न्याय 
- रमेश पोखरियाल "निशंक' ः मनुष्यबळ विकास 
- अर्जुन मुंडा ः आदिवासी विकास 
- स्मृती इराणी ः वस्त्रोद्योग, महिला आणि बालकल्याण 
- डॉ. हर्षवर्धन ः आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूगर्भ संशोधन 
- धर्मेंद्र प्रधान ः पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पोलाद 
- मुख्तार अब्बास नक्वी ः अल्पसंख्याक विकास 
- प्रल्हाद जोशी ः संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण 
- महेंद्रनाथ पांडे ः कौशल्य विकास, उद्योजकता विकास 
- गिरिराजसिंह ः पशुपालन, दुग्धविकास, मत्सोद्योग 
- गजेंद्रसिंह शेखावत ः जलशक्ती (नवीन मंत्रालय) 

राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) 
- संतोष गंगवार ः कामगार 
- राव इंद्रजितसिंह ः सांख्यिकी, कार्यान्वयन, नियोजन 
- श्रीपाद येसो नाईक ः आयुष, संरक्षण राज्यमंत्री 
- जितेंद्रसिंह ः ईशान्य भारत विकास, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, अणुशक्ती विकास, अवकाश संशोधन 
- किरेन रीजिजू ः क्रीडा आणि युवा कल्याण, अल्पसंख्याक 
- प्रल्हाद पटेल ः सांस्कृतिक आणि पर्यटन 
- आर. के. सिंह ः ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा, कौशल्यविकास 
- हरदीपसिंग पुरी ः गृहनिर्माण आणि नगरविकास, हवाई वाहतूक, वाणिज्य उद्योग 
- मनसुख मंडाविया ः जल वाहतूक, रसायन आणि खते 

राज्यमंत्री 
- रावसाहेब दानवे ः ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा 
- रामदास आठवले ः सामाजिक न्याय 
- संजय धोत्रे ः मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान 
- अनुराग ठाकूर ः अर्थ आणि कॉर्पोरेट अफेअर्स 
- फग्गनसिंह कुलस्ते ः पोलाद 
- अश्विनीकुमार चौबे ः आरोग्य आणि कुटुंब कल्याण 
- अर्जुनराम मेघवाल ः संसदीय कामकाज आणि अवजड उद्योग 
- व्ही. के. सिंह ः भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग 
- कृष्णपाल गुर्जर ः सामाजिक न्याय 
- जी. किशन रेड्डी ः गृह 
- पुरुषोत्तम रूपाला ः कृषी 
- साध्वी निरंजन ज्योती ः ग्रामविकास 
- बाबूल सुप्रियो ः वने व पर्यावरण 
- संजीव कुमार बालियान ः पशुपालन, दुग्धविकास, मत्स्योद्योग 
- सुरेश अंगडी ः रेल्वे 
- नित्यानंद राय ः गृह 
- रतनलाल कटारिया ः जलशक्ती आणि सामाजिक न्याय 
- व्ही. मुरलीधरन ः परराष्ट्र आणि संसदीय कामकाज 
- रेणुका सिंह सरुता ः आदिवासी विकास 
- सोमप्रकाश ः वाणिज्य आणि उद्योग 
- रामेश्वर तेली ः अन्नप्रक्रिया उद्योग 
- प्रतापचंद्र सारंगी ः सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग आणि पशुपालन, दुग्धविकास, मत्सोद्योग 
- कैलाश चौधरी ः कृषी 
- देबश्री चौधरी ः महिला आणि बालकल्याण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com