
बघता बघता गेल्या महिन्याभरात पंतप्रधानांचे 5 देश फिरून झालेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिन्यात तब्बल पाच देशांचा दौरा केला आहे. जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्क, नेपाळ आणि जपान या पाच देशांचा दौरा मोदींनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ मे रोजी जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत देशांतर्गत सुरक्षेच्या आणि व्यापाराच्या बाबतीत चर्चा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन आणि राणी मार्गरेथ यांची भेट घेतली. ही भेट ३ आणि ४ मे रोजी झाली होती.

डेन्मार्कच्या या भेटीत त्यांनी युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरील राजकारणावर चर्चा केली आहे.

2022 मध्ये पुन्हा निवडून आलेले फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली त्यावेळी त्यांनी द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. ही भेट ४ मे रोजी झाली.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लुंबिनीला भेट दिली होती. ही भेट १६ मे रोजी झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉड समिटच्या बैठकीसाठी जपानला गेले आहेत. जपान, भारत ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या चार देशांत ही बैठक होणार आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली.
Web Title: Pm Narendra Modi Five Country Visit In One Month
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..