PM MODI GIFTS MELODY CHOCOLATE TO MELONI VIRAL VIDEO
esakal
NARENDRA MODI AND GIORGIA MELONI VIRAL VIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांचा इटली दौरा होता. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्याबाबत चर्चा केली. यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबत रोम इथल्या फ्लावियन अॅम्फिथिएटर असलेल्या प्राचीन कॉलेजियमच्या वास्तूला भेट दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सेल्फी काढत तो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहलं की, 'Welcome to Rome, My Friend'. त्यांचा तो फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.