Budget 2019 : गोयलांचा 'मास्टरस्ट्रोक'; मोदींचे हसू आणि राहूल शांत !

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली : पाच लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा 'मास्टरस्ट्रोक' केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी मारल्यानंतर लोकसभेत 'मोदीSSS मोदीSSS'अशा घोषणा सुरू झाल्या. लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना तब्बल तीन कोटी नोकरदारांना दिलासा देणारा हा निर्णय काँग्रेस आणि विरोधी पक्षांना अडचणीत आणणारा आहे हे निश्चित. या निर्णयाच्या घोषणेनंतर विरोधी बाकांवर पसरलेली शांतता आणि भाजप सदस्यांच्या आनंदाच्या घोषणा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हसू आवरले नाही. काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी कोणतीही प्रतिक्रिया चेहऱयावर उमटू न देता शांत बसून असताना मोदी दिलखुलास हसत सदस्यांना आणि गोयल यांना दाद देत होते. 

मोदी सरकारने शेतकरी आणि कामगारांवर वर्षाव करत इलेक्शन अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर केला. शेतकरी आणि कामगारांना दरमहा बोनस देण्याची क्रांतिकारी घोषणा सरकारने केली. त्यापाठोपाठ पाच लाखांवर कोणताही कर लागणार नसल्याचीही घोषणा करण्यात आली. देशातील नागरिकांमुळे देश बदलतोय, असे गोयल यांनी सांगितले.

मोदीsss मोदीsss
- निवडणुकीच्या तोंडावर सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला 
- शेतकरी, कामगार आणि करदात्यांवर वर्षाव करून सर्वांना खूश करण्याचा प्रय़त्न मोदी सरकारने केला. 
- हा अर्थसंकल्प सादर होताना मोदी सतत टेबलवर हात आपटून गोयल यांचे समर्थन करताना 
- भाजपच्या खासदारांकडून अनेकवेळा मोदी, मोदी घोषणा देण्यात आला. 
- या सरकारची नियत साफ, निती साफ आणि निष्ठा अटल असल्याचे गोयल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com