
सिमला, ता. ९ (पीटीआय) ः मुसळधार पाऊस आणि त्यामुळे भूस्खलन पूर या साऱ्या घटनांमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेल्या हिमाचल प्रदेशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भेट दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशसाठी दीड हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. कांगडा येथील विमानतळावर दाखल झालेल्या पंतप्रधान मोदी यांचे हिमाचलचे राज्यपाल शिवप्रताप शुक्ला आणि मुख्यमंत्री सुखविंदसिंह सुक्खू यांनी स्वागत केले.