PM मोदींमुळे चर्चेत आलेलं 'टेलिप्रॉम्पटर' म्हणजे नेमकं असतं तरी काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एका भाषणातील व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
 What is Teleprompter
What is TeleprompterTeam eSakal

देशात होणाऱ्या लोकसभा निवडणूका असो किंवा गोव्या सारख्या लहान राज्याच्या विधानसभा निवडणूका असो, अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या चेहऱ्यानेच भाजपकडून निवडणूक लढवली जाते. यामध्ये मोदींच्या वक्तृत्व शैलीचा मोठा वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं नेहमी चर्चेचा विषय असतात. मात्र एवढी मोठ-मोठी भाषणं ते नेमकी देतात तरी कशी? तर ते टेलिप्रॉम्पटर (Teleprompter) वापरत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. तसं काही भाषणांमधून दिसूनंही आलं आहे. हे टेलिप्रॉम्पटर म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊ. गुगलवर टेलिप्रॉम्टर असा शब्द जर शोधला तर तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच फोटो आणि व्हिडीओ येत आहेत.

 What is Teleprompter
शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवणाऱ्यांना मतदान करू : टिकैत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये जोरदार भाषण केलं होतं. वाराणसीमधून भाषण करताना त्यांनी महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते उत्तर भारताच्या इतिहासाचा काशीशी असलेला संबंध सांगत अनेक ऐतिहासिक गोष्टी सांगितल्या होत्या. यावेळी त्यांच्या भाषणानंतर काही फोटो व्हायरल झाले होते. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्यासमोर टेलिप्रॉम्पटर असल्याचं दिसतंय. विरोधकांनी त्यांच्या या टेलिप्रॉम्टरवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा काल नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. आंतरराष्ट्रीय दावोस समिटला संबोधित करताना बोलताना अडखळल्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. विरोधकांनी हा व्हिडीओ ट्विट करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. टेलिप्रॉम्पटरने साथ न दिल्याने ही वेळ आल्याचा अनेकांच्या टीकेचा रोख होता.(What is Teleprompter)

 What is Teleprompter
सुभाषचंद्र बोसांच्या महत्तेचा वापर राजकारणासाठी; नेताजींच्या कन्येची नाराजी
Teleprompter
TeleprompterTeam eSakal

टेलिप्रॉम्पटर हे एक असं यंत्र असतं, ज्यामाध्यमातून लिहीलेला एखादा मजकूर वाचण्यास मदत होते. अद्ययावत अशा पद्धतीच्या टेलिप्रॉम्टरचा वापर सहसा टिव्ही स्टुडीओमध्ये बातम्या वाचण्यासाठी, , शुटींग दरम्यान एखादी मोठी स्क्रीप्ट वाचण्यासाठी केला जातो. टिव्ही स्टुडीओमध्ये वापरलं जाणारं टेलिप्रॉम्पटर हे दोन स्क्रीन वापरून तयार केलं जातं. त्यातील एका स्क्रीनच्या मागे कॅमेरा लावला असतो आणि त्यावर लिहीलेला मजकूर दिसत असतो. त्यामूळे वाचणारा नेमका कॅमेऱ्यात बघतो आहे असंच जाणवतं. मात्र मागच्या काही काळात वेगवेगळ्या वक्त्यांनी आपलं वकृत्व प्रभावी वाटावं यासाठीही त्याचा वापर केलेला दिसतो. एखाद्या व्यासपीठावर भाषण करताना त्या व्यक्तिच्या समोर दोन्ही बाजूंना रायटींग पॅडच्या आकाराचे दोन टेलिप्रॉम्टर लावलेले असतात. ज्यामध्ये आपल्याला हवा तो मजकूर टाकून स्क्रोल करता येतो. ज्यामूळे दोन्ही बाजूंच्या टेलिप्रॉम्पटरकडे बघून वाचताना वक्ता लोकांकडे बघून वाचत असल्याचा भास होतो.

 What is Teleprompter
भारताने जगाला आशेचा पुष्पगुच्छ भेट दिलाय: PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भाषण करताना त्याचा वापर करतात असा आरोप अनेकदा विरोधकांकडून केला गेला आहे. आणि काल त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाही तर जगभरातील आणि भारतातील अनेक नेते भाषणासाठी याचा वापर करतात. याबद्दलच्या अनेक बातम्या पाहायला मिळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com