esakal | मोदींनी गुजरातला दिली सुंदर भेट; भावनगर-सूरतदरम्यान समुद्री फेरी सेवेचे उद्घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

pm modi

आज नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे भावनगर आणि सूरतच्या दरम्यान समुद्रातून फेरी सेवेचे उद्घाटन केले आहे.

मोदींनी गुजरातला दिली सुंदर भेट; भावनगर-सूरतदरम्यान समुद्री फेरी सेवेचे उद्घाटन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला एक सुंदर भेट दिली आहे. आज नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे भावनगर आणि सूरतच्या दरम्यान समुद्रातून फेरी सेवेचे उद्घाटन केले आहे. आता भावनगर आणि गुजरातच्या दरम्यानचे 375 किलोमीटरचे अंतर कमी होऊन ते फक्त 90 किलोमीटर इतके झाले आहे. या प्रसंगी नरेंद्र मोदी म्हणाले की, आज घोघा आणि हजीराच्या दरम्यान रोपॅक्स सेवेस सुरवात होत आहे. त्यामुळे सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात या दोन्हीही क्षेत्रातील लोकांचे वर्षांनुवर्षाचे स्वप्न पूर्ण होत आहे. 

हेही वाचा - LoC वरुन घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्याला कंठस्नान; AK47 जप्त

मोदींनी म्हटलं की या सेवेमुळे घोघा आणि हजीराच्या दरम्यानचे आताचे जे रस्त्यावरुनचे 375 किमीचे अंतर आहे ते समुद्राच्या मार्गाने फक्त 90 किमी होईल. म्हणजे जे अंतर पार करायला 10 ते 12 तास लागायचे आता तोच प्रवास फक्त 3 ते 4 तासांत होईल. वेळ तर वाचेलच सोबतच आपला खर्च देखील वाचेल. 

त्यांनी या प्रोजेक्टशी निगडीत लोकांचे आभार मानत म्हटलं की, गुजरातमध्ये रोपॅक्स फेरी सेवासारख्या सुविधांच्या विकासासाठी खुप लोकांचे श्रम लागले आहेत. यामध्ये अनेक अडचणी आल्या आहेत. मी त्या सर्वांचा आभारी आहे. त्या सर्व इंजिनिअर्सचे तसेच कामगारांचे मी आभार मानतो. ते हिंमतीने उभे राहिले. 

हेही पहा - आज काय विशेष : कोण आहेत Joe Biden आणि Kamala Harris?

पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटलं की, आज गुजरातमध्ये समुद्रातील कारभाराशी निगडीत इन्फ्रास्ट्रक्चर आणि कपॅसिटी बिल्डींगवर जोरात काम सुरु आहे. जसे गुजरा मेरीटाईम क्लस्टर, गुजरात समुद्री विश्वविद्यालय, भावनगरमध्ये सीएनजी टर्मिनल याप्रकारच्या अनेक सुविधा गुजरातमध्ये तयार होत आहेत. 

त्यांनी म्हटलं की, सरकारचे प्रयत्न, घोघा-दहेजच्या दरम्यानची फेरी सेवेलाही लवकरच सुरवात करायची आहे. या प्रोजेक्टच्या दरम्यान अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणींना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.