LoC वरुन घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्याला कंठस्नान; AK47 जप्त

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

सात आणि आठ नोव्हेंबरच्या रात्री माचिल सेक्टरमधील नियंत्रण रेषेच्या कुंपणाजवळ संशयास्पद हालचाली झाल्याचे दिसून आले.

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील शोपियान भागातील दहशतवाद्यांविरोधात केली गेलेली कारवाई अद्याप ताजी आहे. अशातच पुन्हा एका दहशतवादी कारवाईचा सैन्याकडून बिमोड करण्यात आला आहे. ही घटना आहे जम्मू आणि काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातील. या जिल्ह्यातील माचिल सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. LoC वरुन घुसखोरी करणाऱ्या या दहशतवाद्याला काल मध्यरात्री ठार करण्यात आल्याची माहिती सैन्याने दिली आहे. 

हेही वाचा - अर्णब यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या दोन भाजप नेत्यांना अटक

सात आणि आठ नोव्हेंबरच्या रात्री माचिल सेक्टरमधील नियंत्रण रेषेच्या कुंपणाजवळ संशयास्पद हालचाली झाल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती श्रीनगर हेडक्वॉर्टर्स 15 कोर्प्सने आपल्या ट्विटर हँडलवर दिली आहे.

हेही पहा - आज काय विशेष : कोण आहेत Joe Biden आणि Kamala Harris?

घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. या कारवाईत एके-47 रायफल आणि दोन बॅग जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबतची कारवाई अद्याप सुरु आहे, असं लष्कराच्या निवेदनात सांगण्यात आलं आहे. 

सुरक्षा दलातील वरिष्ठांनी म्हटलंय की, हिवाळ्यातील हिमवृष्टीमुळे जम्मू आणि काश्मीरमधील डोंगरावर जाणे कमी होते, या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घुसखोऱ्यांच्या प्रयत्नांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: infiltration bid foiled in J&Ks Kupwara Terrorist killed क्ष AK 47 rifle seized

Tags
टॉपिकस
Topic Tags: