PM Narendra Modi: भारतीय सैन्य न्युक्लिअर धमकीची हवा काढून घेते... दहशतवादी आता पाकिस्तानातही सुरक्षित नाहीत,पंतप्रधान मोदी गरजले
PM Narendra Modi : जेव्हा आपले सैनिक भारतमातेचा जयघोष करतात तेव्हा शत्रूचे हृदय थरथर कापते. जेव्हा आपले सैन्य कोणत्याही न्युक्लिअर धमकीतील हवा काढून घेते तेव्हा जमिनीपासून आकाशापर्यंत फक्त 'भारत माता की जय'चा नारा घुमतो.
PM Narendra Modi addressing theAir force jawans, declaring a strong stance against terrorism and assertingesakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आदमपूर हवाई तळावर हवाई दलाच्या जवानांना संबोधित केले. ते म्हणाले, 'भारत माता की जय ही केवळ घोषणा नाही. ही भारत मातेसाठी आपले जीवन धोक्यात घालणाऱ्या अनेक चेहऱ्यांनी घेतलेली संयुक्त शपथ आहे.