पंतप्रधान मोदींचा तेजस्वींना फोन; लालू यादवांच्या तब्येतीची केली विचारपूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lalu Prasad Yadav and Narendra Modi

पंतप्रधान मोदींचा तेजस्वींना फोन; लालू यादवांच्या तब्येतीची केली विचारपूस

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना पुढील उपचारांसाठी आज पाटण्याहून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीला आणले जाणार आहे. माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या शासकीय निवासस्थानात लालू यादव रविवारी पायऱ्यांवरून घसरून पडले होते. त्यानंतर लालू यांना पाटणा येथील पारस हॉस्पिटलच्या सर्जिकल आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. (pm narendra modi inquired about lalu prasad yadav health)

हेही वाचा: देवेंद्रजी वेशांतर करून शिंदेंना भेटायचे; अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी तेजस्वी यादव यांना फोन करून राजद प्रमुख लालू प्रसाद यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधानांनी लालू प्रसाद यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान लालू यादव यांना चांगल्या उपचारासाठी 6 जुलै रोजी पाटण्याहून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीला आणले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान लालू यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तब्येत स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

लालू प्रसाद यादव 3 जुलै रोजी घरात पाय घसरून पडले होते. त्यात त्यांच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर आणि पाठीला दुखापत झाली. लालू यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी ट्विटरवर भावनिक पोस्ट शेअर केली होती. ''हर बाधाओं से जिसने पाई है मुक्ति, करोड़ों लोगों की दुआएं है जिनकी शक्ति'' अशा ओळी रोहिणी यांनी पोस्ट केल्या होत्या.

Web Title: Pm Narendra Modi Inquired About Lalu Prasad Yadav Health

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top