
PM Narendra Modi launches the Swadeshi Sankalp initiative at the start of the GST Savings Festival, encouraging citizens to embrace local products.
Sakal
नवी दिल्ली : ‘‘वस्तू आणि सेवा कर प्रणालीतील (जीएसटी) सुधारणेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून गरीब आणि मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार आहे. सोमवारपासून (ता. २२) या सुधारणांच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार असून वस्तू स्वस्त झाल्याने जनतेचे तोंड गोड होईल,’’असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला देशावासीयांशी संवाद साधताना मोदी यांनी, ‘विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा संकल्प करावा,’ असे आवाहनही केले.