'आक्रमक' मोदी पुण्यात मवाळ; आता विकासकामांवर भर!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी सरकारने केलेल्या विकासकामांची जंत्रीच वाचून दाखविली.

शहरातील मेट्रोच्या तिसर्‍या टप्प्याचे भूमिपूजन आज पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीष बापट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

पुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी सरकारने केलेल्या विकासकामांची जंत्रीच वाचून दाखविली.

शहरातील मेट्रोच्या तिसर्‍या टप्प्याचे भूमिपूजन आज पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीष बापट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा होता. दरम्यानच्या काळात राफेल विमान खरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि शीखविरोधी दंगलीमध्ये कॉंग्रेसचे नेते सज्जनकुमार यांना झालेली जन्मठेपेची शिक्षा असे विरोधकांना धक्के देणारे दोन निर्णय समोर आले. यापैकी एकाही विषयाला हात न घातला मोदी यांनी पुण्यात 'न्यू इंडिया'वर भर दिला. यामध्ये त्यांनी देशभरातील पायाभूत सुविधांवर होत असलेले काम आणि भविष्यात कोणत्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत, यावरच सर्व भर दिला.

पंतप्रधान नरेद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे : 

- पुण्यात 12 किमीपेक्षा अधिक मेट्रो धावेल.

- लोकांना पिंपरी किंवा हिंजवडी येथे पोहचण्यासाठी लाभ होणार आहे.

- आज येथे ज्या प्रकल्पांचे सुरवात झाली. त्यामध्ये व्यापक व्हिजनचा हिस्सा आहे.

- कन्याकुमारी, कच्छ मोठ्या प्रमाणात काम होत आहे

- आज गावापासून शहरापर्यंत लक्ष दिले जात आहे.

- केंद्र सरकार आणि फडणवीस सरकार मिळून प्रकल्पासाठी मदत करत आहे.

- देशात सर्वत्र झपाटयाने विकासकामे सुरू आहे. हे काम सरकार करीत असले तरी त्यामागे लोकांची भावना जोडली जात आहे

- मेट्रोमुळे आयटी आणि आयटीयन्सला दिलासा मिळणार आहे

- पुण्यातील मेट्रोच्या दोन्ही मार्ग गतीने, पुढील वर्षीच्या शेवटी मेट्रो धावेल

- पुढील वर्षभरात पुण्यात 12 किलोमीटरचा मेट्रो मार्ग तयार होईल.

- 300 किमी नव्या मेट्रोलाईनचे काम केले जात आहे.

- 500 किमीपेक्षा जास्त अंतराची मेट्रोलाईन सुरु आहे.

- 650 मेट्रोलाईनचे काम केले जात आहे.

- मेट्रोला गती अटलजींच्या सरकारने दिली. मात्र, आमच्या सरकारने स्पीड दिला.

- अटलजींच्या सरकारच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांना मेट्रोचे काम झाले असते.

- देशात वाहतूक व्यवस्थांचे एकत्रीकरण केले जात आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मार्ग हा पीपीपी तत्वावरील पहिला प्रकल्प आहे.

- राज्यात 200 किलोमीटर लांबीच्या मेट्रोचे काम सुरु

- देशाचा संतुलित विकास करणे हे आमच्या सरकारचे ध्येय

- 10 हजार कोटींचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत

- महाराष्ट्रातील आठ शहरांचे 1500 कोटींचे काम पूर्ण झाले असून, 3500 कोटींचे काम झपाट्याने होत आहे

- देशात पुण्यासह १०० स्मार्ट सिटींची निर्मिती सुरू, यावर दोन लाख कोटींचा खर्च होणार.

- देशात सहाशे किलोमीटचया मेट्रोचे काम सुरू आहे. आणखी पाचशे किलोमीटर लांबीचा मार्ग नियोजित आहे. महाराष्ट्रात दोनशे किलोमीटरचे जाळे असेल.

- जन्मप्रमाणपत्रापासून मृत्यूप्रमाणपत्र ऑनलाईन आहे.

- अनेक सुविधा ऑनलाईन करण्यात आल्या.

- भ्रष्टाचाराला आळा बसविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत

- डिजीलॉकरमुळे डिजिटायझेशन होत आहे.

- नियम सरल आणि सुगम असे असायला हवेत.

- सामान्य व्यक्तीकडेही सुविधा पोचत आहेत.

- भारत जगातील दुसरा मोबाईल निर्माता असलेला देश बनला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi lays foundation of Pune Metro