esakal | आता विस्तारवाद विसरा; पंतप्रधान मोदींचा चीनला इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi, Chief of Defence Staff General Bipin Rawat, Army Chief, MM Naravane, Ladakh

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनपेक्षितपणे लेह-लडाखला भेट दिली. भारत आणि चीनदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची भेट महत्वाची आहे. जवानांचे मनोधैर्य वाढावे यासाठी मोदींनी लडाखमध्ये जवानांना संबोधित केले.

आता विस्तारवाद विसरा; पंतप्रधान मोदींचा चीनला इशारा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लेह- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनपेक्षितपणे लेह-लडाखला भेट दिली. भारत आणि चीनदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची भेट महत्वाची मानली जात आहे. जवानांचे मनोधैर्य वाढावे यासाठी मोदींनी लडाखमध्ये जवानांना संबोधित केले. जवानांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा देशाला अभिमान आहे. जवानांनी सर्व जगाला आपले शौर्य दाखवून दिले आहे. आता विस्तारवादाला थारा नाही, असे म्हणत त्यांनी चीनची आरेरावी सहन करणार नसल्याचा इशाराच चीनला दिला आहे.
जगाला दिशा देणार भारत; १५ ऑगस्टपर्यंत येणार कोरोनावर लस
 

भारतीय जवानांचे शौर्य हे लडाखमध्ये असलेल्या पर्वतांपेक्षाही उंच आहे. लडाख हे भारताचे मस्तक आहे. त्यामुळे चीनने आपला विस्तारवाद विसरावं. विस्तारवादाचं युग आता संपलं आहे, आता विकासाचं युग आहे. विस्तारवादामुळे नेहमीच मानवजातीचा विनाश झाला आहे, असं म्हणत मोदींनी चीनला कठोर शब्दात सुनावलं आहे. 

भारतीय जवानांचे बाहू पर्वतासारखे मजबूत आहेत. जवानांचे शौर्य आणि साहस,  माँ भारतीच्या सुरक्षेसाठीचे त्यांचे समर्पन अतुलनीय आहे. ज्या कठीण परिस्थितीत तुम्ही इतक्या उंचीवर देशाच्या सुरक्षेसाठी ढाल बनून उभे आहात, त्याची तुलना जगात कशाशीही होऊ शकत नाही. तुमचा निश्चय या पर्यतांच्या कठोरतेपेक्षाही अधिक आहे. देशाची सुरक्षा तुमच्या हातात आहे. त्यामुळे मीआणि सर्व भारवासी निश्चिंत आहोत. तुम्ही जे शौर्य दाखवले आहे, त्यामुळे संपूर्ण जगाला आपली ताकद काय आहे याची प्रचिती आली आहे असं म्हणत मोदींनी जवानांचे धैर्य वाढवले आहे. 

व्लादिमिर पुतीन यांच्यासाठी राज्यघटनेतच बदल; 2036 पर्यंत सत्तेवर?
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या काही ओळी जवानांना ऐकवल्या-

जिनके सिंहनाद से सहमी
धरती रही अभी तक डोल,
कलम, आज उनकी जय बोल.
मैं आज अपनी वाणी से आपकी जय बोलता हूं...

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या शहीदांना मी श्रद्धांजली वाहतो. त्यांचा पराक्रम आणि सिंहनादाने भूमाता अजूनही जयकारा करत आहे. आज सर्व देशवासियांचे मस्तक तुमच्या समोर आदरपूर्वक नमन होत आहे. आज प्रत्येक भारतीयाची छाती तुमची विरता आणि पराक्रमाने फुगली आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.

loading image