esakal | '...आता हे जास्त होत आहे'; लोकसभेत PM मोदी काँग्रेस नेत्यावर भडकले
sakal

बोलून बातमी शोधा

NARENDRA MODI

लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव सादर केला

'...आता हे जास्त होत आहे'; लोकसभेत PM मोदी काँग्रेस नेत्यावर भडकले

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव सादर केला. यावेळी विरोधकांनी वारंवार खोडा घालण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. काळे कायदे मागे घ्या, अशा घोषणा काँग्रेससह तृणमूलच्या खासदारांनी दिल्या. पंतप्रधान मोदी यामुळे संतापल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे त्यांनी तृणमूलचे खासदार अधिर रंजन चौधरी यांना धारेवर धरले. 

नरेंद्र मोदींनी काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांना सुनावलं. अधिर रंजन जी, आता हे जास्त होत आहे. मी तुमचा आदर करतो. तुम्हाला चांगली प्रसिद्धी मिळेल, काळजी नको. हे चांगलं दिसत नाही. तुम्ही हे का करत आहात, असं ते म्हणाले. विरोधक गोंधळ घालत असल्याचं पाहून मोदी म्हणाले की, विरोधक लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यांचा भांडाफोड होऊ नये यासाठी ते गोंधळ घालत आहेत. विरोधकांनी गोंधळा नाही घातला, तर सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचेल. 

Lok Sabha PM Modi: पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशातील सर्वात जुना पक्ष आज या परिस्थितीत येऊन पोहोचला आहे. काँग्रेस पार्टी आता कनफ्यूज पार्टी बनून राहिली आहे. लोकांच्या मनात भय निर्माण केलं जात आहे. 21 व्या शतकात भारताला नेतृत्व करण्यासाठी काही महत्त्वाच्या सुधारणा कराव्या लागतील. नवे कृषी कायदे देशातील शेतकऱ्यांना गरिबीतून बाहेर काढतील. त्यांनी आयुष्यभर गरिबीतच जगावं का, असा सवाल मोदींनी केला. 

देशातील शेतकऱ्यांना विकासाच्या संधी मिळणार आहेत. त्यांची उन्नती व्हावी यासाठी कृषी कायदे आणण्यात आले आहेत. एमएसपी आणि बाजार समित्या कायम राहणार आहेत. पण, यावरुन शेतकऱ्यांनी दिशाभूल केली जात आहे. मनमोहन सिंग सरकारच्या काळात अशा प्रकारचे कायदे आणले जाणार होते. शरद पवार यांचेही या कायद्यांना समर्थन होते. पण, ते आता आम्ही आणलेल्या कायद्यांना विरोध करत आहेत. त्यामुळे त्यांच्या हेतूविषयी शंका येते. शेतकऱ्यांना असत्य सांगितलं जात आहे, असं मोदी म्हणाले.

आंदोलनकारी आणि आंदोलनजीवी यांच्यात भारतीयांनी फरक करायला हवे. शेतकरी आंदोलनात अनेक वादग्रस्त व्यक्तींचे पोस्टर झळकवले जात आहेत. दहशतवादी, नक्षलवादी, विभाजनवादी लोकांच्या सुटकेची मागणी करणे म्हणजे शेतकरी आंदोलनाला कलंकीत करण्याचे काम आहे, असंही मोदी म्हणाले.