esakal | 'मॅन व्हर्सेस वाइल्ड'मुळे जगभरातील युवकांशी जोडले गेलो: नरेंद्र मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

“मूठभर धान्य” चा उल्लेख !
पाणी अन्न आणि सुभाषित ही पृथ्वीवरची रत्ने आहेत सुभाषित उल्लेख करून मोदी यांनी पोषण अभियानाचे तत्व सांगितले. कुपोषणाविरुद्धच्या लढाईत सप्टेंबर महिन्यात पोषण अभियानाला आणखी बळ द्यावे असे आवाहन त्यांनी केले. नाशिक जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविकांनी चालविलेल्या मूठभर धान्य, या मोहिमेचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

'मॅन व्हर्सेस वाइल्ड'मुळे जगभरातील युवकांशी जोडले गेलो: नरेंद्र मोदी

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : डिस्कव्हरी वाहिनीवर मॅन व्हर्सेस वाइल्ड या मालिकेतील आपल्या कार्यक्रमामुळे आपण जगभरातील युवकांशी जोडले गेलो असे सांगतानाच त्यांनी, या कार्यक्रमाचे प्रसारण 165 देशांमध्ये त्या त्या भाषांमध्ये करण्याची योजना डिस्कव्हरीने असल्याचे सांगितले. यातील मुलाखत कर्त्याला हिंदी येत नसतानाही तो इतका सहज संवाद कसा साधू शकत होता, याअनेक जणांच्या शंकेचे निरसन करताना मोदींनी हिंदीचे इंग्रजीत अनुवाद करणाऱ्या कॉर्डलेस फोनची ही किमया होती असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त केवळ एका दिवसाचा उत्सव करण्यापेक्षा 130 करोड भारतवासियांच्या सर्व समाजघटकांनी मिळून समाजाच्या उन्नतीसाठी काय करावे, समाजासाठी माझ्या परीने मी काय करू शकतो हे प्रत्येक ठरवावे आणि अमलात आणावे, असे आवाहन करतानाच सेवा आणि समाजसंवर्धन ही भावना प्रत्यक्षात आणणे हिच बापूंना खरी कार्यांंजली ठरेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. 

आकाशवाणीवरील आपल्या 'मन की बात' या मासिक संवाद सत्रात बोलताना पंतप्रधानांनी, यंदा दोन ऑक्टोबरला देशवासीयांनी स्वच्छतेबरोबरच प्लास्टिक मुक्तीचा आणि सिंगल युज प्लास्टिक नष्ट करण्याचा संकल्प करावा, असे पुन्हा आवाहन केले. 15 ऑगस्टला आपण लाल किल्ल्यावरून हे आवाहन केल्यावर अनेक दुकानदारांनी ग्राहकांना कापडी पिशव्या आणण्याचे आवाहन केले आहे. 

उत्तर भारतात जन्माष्टमीचा माहोल असताना, मोहन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची आणि तेच नाव असलेल्या मोहनदास करमचंद गांधी या राष्ट्रपित्याची आठवण जागवून मोदींनी आजच्या संवादाला सुरुवात केली. ते म्हणाले, की यमुनेतीरी जन्मलेल्या एका मोहनाने द्वारकातिरी आपले आयुष्य घालवले. तर समुद्र किनाऱ्यावर जन्मलेल्या मोहनदास यांनी यमुनेच्या तिरावरील दिल्लीत पर्यंतचे आयुष्य व्यतीत केले. त्यांनी चरख्याच्या सहाय्याने अहिंसेच्या मार्गाने बलाढ्य ब्रिटीश साम्राज्याला नमविले. 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर च्या एका छोट्याशा घरात एका युगाचा जन्म झाला. महात्मा गांधींची दीडशेवी जयंती साजरी करत असताना आपण हे लक्षात घेतले पाहिजे. सेवाभाव हा त्यांच्या जीवनाशी कायम जोडलेला राहिला मानवतेला नवे वळणा देणाऱ्या या महापुरुषाने गरीब निराधार लोकांची सेवा हेच आपल्या आयुष्याचे ध्येय मानले. केवळ शब्दात नव्हे तर सत्यात सेवाभाव उतरवणाऱ्या गांधीजींचे सेवाभावाशी अतूट नाते होते. गांधीजी हे असंख्य भारतीयांचे आवाज बनलेच पण जगभरातील माणुसकीचे ते आवाज बनले. त्यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशवासीयांनी गांधीजींशी जोडल्या गेलेल्या सेवाग्राम, पोरबंदर, चंपारण्य, दिल्ली, वर्धा यापैकी कुठल्याही ठिकाणाला भेट द्यावी आणि आपली छायाचित्रे तसेच शब्दबद्ध भावना समाज माध्यमांवर आवर्जून शेअर कराव्यात असेही आवाहन मोदींनी केले. राज्यघटनेचे आलेखन करणारे नंदलाल बोस यांनी गांधींच्या जीवनावर आधारित घटनांवर रेखाटलेल्या आठ चित्रांनी पेनिस नाले या जगप्रसिद्ध कला महोत्सवात उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले असे त्यांनी सांगितले. येत्या गांधी जयंतीपासून 7 मोठे जनआंदोलन उभे राहावे. प्लास्टिकच्या घातक कचऱ्यापासून भारतमातेला मुक्त करण्यासाठी देशवासीयांनी संकल्प सोडावा प्लास्टिक कचरा मुक्तीसाठी प्लास्टिकच्या फेर वापरासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करावी असे आवाहन मोदींनी केले. 

वाघांची संख्या दुप्पट करावी यासाठी जागतिक पातळीवर सर्व देशांनी ठरविलेले उद्दिष्ट नव भारताने मुदती आधीच पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी संकल्प सिद्धीचा केला. गुजरातेतील गीरच्या अभयारण्यातही वनक्षेत्राच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

“मूठभर धान्य” चा उल्लेख !
पाणी अन्न आणि सुभाषित ही पृथ्वीवरची रत्ने आहेत सुभाषित उल्लेख करून मोदी यांनी पोषण अभियानाचे तत्व सांगितले. कुपोषणाविरुद्धच्या लढाईत सप्टेंबर महिन्यात पोषण अभियानाला आणखी बळ द्यावे असे आवाहन त्यांनी केले. नाशिक जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविकांनी चालविलेल्या मूठभर धान्य, या मोहिमेचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

loading image
go to top