PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटींबाबत दिली माहिती | PM Modi Security Breach | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi with President Kovind

PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटींबाबत दिली माहिती

नवी दिल्ली : पंजाबमधील दौऱ्यादरम्यान PM नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षेबाबत निर्माण झालेला गोंधळ केंद्र सरकार गांभीर्यानं घेतला आहे. त्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी यांनी ही बाब राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या कानावर घालण्यासाठी राष्ट्रपती भवन येथे त्यांची भेट घेतली. याबाबत माहिती घेतल्यानंतर सुरक्षेतील या गंभीर त्रुटींबद्दल राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली. (PM Narendra Modi meets President gives Info on security flaws in Punjab)

पंतप्रधान ताफ्याच्या सुरक्षेबाबत सुरु झालेल्या चर्चेनंतर उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांनी देखील पंतप्रधान मोदींना फोन करुन त्यांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत काळजी व्यक्त केली. प्रस्थापित सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी आणि भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही याची खात्री करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, अशी आशाही नायडू यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: 'तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद,मी सुखरूप परतलोय'- नरेंद्र मोदी

पंजाबमधील दौऱ्यात नक्की काय घडलं होतं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ही सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर सुमारे 15 ते 20 मिनिटे अडकून पडला होता. सुरक्षेच्या कारणस्तव पंतप्रधान मोदींना पुन्हा भटिंडा विमानतळावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

सुरक्षेत कोणतीही त्रुटी नव्हती : पंजाबचे मुख्यमंत्री

दुसरीकडे पंजाब काँग्रेसने हे आरोप धुडकावून लावले आहेत. एका पंजाबी वाहिनीवरील टीव्ही मुलाखतीत या घटनेवर प्रतिक्रिया देताना पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी (Charanjit Channi ) यांनी म्हटलं की, “सुरक्षेत कोणतीही चूक नव्हती. पंतप्रधान ज्या मार्गावरुन जाणार होते त्याबाबतच्या आराखड्याची योजना शेवटच्या क्षणी बनवण्यात आली. त्यांना हेलिकॉप्टरने जायचे होते. त्यांच्या रॅलीच्या सुरक्षा व्यवस्थेवर मी रात्री उशिरापर्यंत काम करत होतो. रॅलीसाठी 70,000 खुर्च्या लावण्यात आल्या होत्या पण फक्त 700 लोक आले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top