esakal | Video : मोदींचा चिऊ चिऊ चिमणी गाण्याचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

narendra_modi_4.jpg

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपुर्वीच स्वतः एक खास व्हिडिओ शेअर केला होता.

Video : मोदींचा चिऊ चिऊ चिमणी गाण्याचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

sakal_logo
By
सागर शेलार

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपुर्वीच स्वतः एक खास व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत मोदी हे राष्ट्रीय पक्षी मोरासोबत फेरफटका मारताना दिसत आहेत. मोदींच्या निवासस्थानी जे गार्डन आहे, तिथे मोर आहेत. त्या मोरासोबतचा व्हिडिओ खुद्द मोदींनीच शेअर केलाय. इतकंच नाही तर मोदी यांनी शेअर केलेल्या त्या व्हिडिओवरून आता त्यांची खिल्ली उडविणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली बातमीत देत आहोत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्हिडिओत काय? 
दोन दिवसांपुर्वी पंतप्रधानांनी राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचा व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ते मोरासोबत फोरफटका मारताना दिसत आहेत, तसेच ते त्याला खाऊ घालताना दिसत आहेत. या व्हिडिओत मोदी एका मोठ्या सभेत स्वत: वाद्य वाजविताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे या व्हिडिओत अनिल कपुर व माधुरी दीक्षित यांचे एका चित्रपटातील गाजलेल्या गाण्यातील नृत्य घेतले आहे.-

 'नासा'ला जमलं नाही ते 'आयुका'नं करून दाखवलं; अत्यंत दूरच्या दीर्घिकेचा घेतला शोध   

पंतप्रधानांचे मोर प्रेम पाहुन अनेकांनी त्यांचे कौतुक देखील केले होते. कारण या व्हिडिओत मोदी हे मोराला खायला घालताना दिसत होते. त्यामुळे अनेकांनी पंतप्रधान कसे हे प्राणीप्रेमी आहेत याबाबत समर्थन केले, तर अनेकांनी राष्ट्रीय पक्षी पाळल्यामुळे टीका देखील केली होती.

आता याच व्हिडिओवरून त्यांची खिल्ली उडविणारा आणखी एक व्हिडिओ व्हायरला झाला आहे. चिऊ चिऊ चिमणी अशा स्वरूपाचे मराठी गाणे बॅकग्राऊंडला वापरून मोदी यांचा मोराचा व्हिडिओ चिऊ चिऊ चिमणी आणि माधुरी दीक्षित व अनिल कपूर यांचे गाणे मिक्स करून त्यांची खिल्ली उडवितानाचा व्हिडिओ फेसबुक व इतर सोशल मीडियावर व्हायरला होताना दिसत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. मोदी समर्थकांनी त्यावर टीका करत आहेत, परंतू विरोधक मात्र या व्हिडिओचा आनंद घेत शेअर करत आहेत.  

(Created by : Sagar Diliprao Shelar)

loading image
go to top