Nirmala Sitharaman : दोघेही सारखेच! "डॉलर मजबूत होतोय"च्या चर्चेत नेटकऱ्यांना आठवतायत PM मोदी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nirmala Sitharaman PM Narendra Modi
Nirmala Sitharaman : दोघेही सारखेच! "डॉलर मजबूत होतोय"च्या चर्चेत नेटकऱ्यांना आठवतायत PM मोदी!

Nirmala Sitharaman : दोघेही सारखेच! "डॉलर मजबूत होतोय"च्या चर्चेत नेटकऱ्यांना आठवतायत PM मोदी!

रुपया घसरलेला नाही, डॉलर मजबूत होतोय, हे विधान तुम्ही ऐकलं असेलच. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं हे विधान सध्या चांगलंच चर्चेत आहेत. याच्याच पार्श्वभूमीवर आता नेटकऱ्यांना पंतप्रधान मोदींची आठवण झालीय. त्यांचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या विधानानंतर त्यांना सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जाऊ लागलं आहे. रुपयाचं अवमूल्यन होत नाही तर डॉलर अधिक मजबूतं होतोय, असं सीतारामन एका पत्रकार परिषदेत म्हणाल्या आहेत. त्याचसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हि़डीओही अनेकांनी व्हायरल केला आहे. त्याचबरोबर निर्मला सीतारामन यांची खिल्ली उडवणाऱ्या पोस्ट्स लिहिताना त्यामध्ये पंतप्रधान मोदींचाही उल्लेख केला जात आहे.

हेही वाचा: Nirmala Sitharaman: रुपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होतोय; सीतारामन यांचं अजब विधान

काय आहे या व्हिडीओमध्ये?

पंतप्रधान मोदींच्या या व्हिडीओमध्ये ते हवामान बदलाविषयी बोलत आहेत. हवामान बदलाचे कसे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत, त्याची कारणं, या विषयावर मोदी बोलत आहेत. यामध्ये पंतप्रधान मोदी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, "उष्णता वाढलेली नाहीये तर वय वाढल्याने सहन करण्याची शक्ती कमी झाली आहे. तसंच हवामान बदल झालेला नाही, आपण बदललोय. " या व्हिडीओवरुन ते सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहेत. नेटकऱ्यांसाठी पंतप्रधान मोदी आणि निर्मला सीतारामन दोघेही आता चेष्टेचा विषय ठरू लागले आहेत.