

Narendra Modi
esakal
Narendra Modi 2047 vision : गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी सुरू केलेल्या राजकीय प्रवासाला आज २५ वर्षे पूर्ण झाली. मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा प्रदीर्घ राजकीय प्रवास पूर्ण केलेल्या मोदी यांनी या निमित्ताने २०४७ पर्यंत भारताला विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनविण्याचा संकल्प व्यक्त केला.