27 वर्षांपूर्वी मोदी बोलले; आज खरं करून दाखवलं!

वृत्तसंस्था
Wednesday, 14 August 2019

'लाल चौकात जो तिरंगा फडकावेल तो पुन्हा जिवंत परतणार नाही, अशा आशयाची दहशत पसरवणारी पोस्टर्स श्रीनगरमध्ये लागत होती. ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी श्रीनगरच्या लाल चौकात येऊन तिरंगा फडकवून दाखवावा... पण हा काळ काही दूर नाही, परवा 26 जानेवरीलाच लाल चौकात तिरंगा फडकावला जाईल...'

'लाल चौकात जो तिरंगा फडकावेल तो पुन्हा जिवंत परतणार नाही, अशा आशयाची दहशत पसरवणारी पोस्टर्स श्रीनगरमध्ये लागत होती. ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी श्रीनगरच्या लाल चौकात येऊन तिरंगा फडकवून दाखवावा... पण हा काळ काही दूर नाही, परवा 26 जानेवरीलाच लाल चौकात तिरंगा फडकावला जाईल...' असे भाषण 27 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. या वर्षी लाल चौकात तिरंगा फडकवला जाणार आहे आणि अशा प्रकारे मोदींनी आपल्या भाषणात वापरलेले शब्द खरे करून दाखवले आहेत. उद्या 15 ऑगस्ट देशाच्या 73व्या स्वातंत्र्यदिनी लाल चौकात तिरंगा फडकावला जाईल. 

मोदींनी 27 वर्षांपूर्वी 11 डिसेंबर 1991 मध्ये श्रीनगर येथील लाल चौकात काढलेल्या एकता यात्रेत हे भाषण केले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) होता. त्यांनी भाषणात म्हणल्याप्रमाणे, त्यावेळीही लाल चौकात तिरंगा फडकावला होता. दहशतवाद्यांचे सावट आणि तेव्हाच्या काश्मीर सरकारची असफलता यामुळे सगळ्या जम्मू-काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण होते. अशात आपल्याच देशाचा तिरंगा लाल चौकात फडकावणे हे अशक्य समजले जायचे. त्यावेळीही मोदींनी लाल चौकात तिरंगा फडकावला होता. त्यांचे हे भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

370 कलम रद्द करण्याबाबत मोदी सरकार कायमच आक्रमक होते. 370 कलम रद्द करण्याबाबत राज्यसभा व लोकसभेत प्रस्ताव मांडण्यात आला व मंजूरही करण्यात आला. त्याप्रमाणे जम्मू-काश्मीर आता भारताचा अविभाज्य भाग व केंद्रशासित प्रदेश असेल व देशवासियांना सर्व प्रकारचे व्यवहार जम्मू-काश्मीरमध्ये करता येतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi s speech in 1991 gets viral