esakal | शेतकऱ्यांना अफवांपासून वाचवण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांची- नरेंद्र मोदी 
sakal

बोलून बातमी शोधा

narendramodi_.jpg

केंद्र सरकारने संदसेत तीन कृषी विधेयके मंजूर करुन घेतली आहेत

शेतकऱ्यांना अफवांपासून वाचवण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांची- नरेंद्र मोदी 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- केंद्र सरकारने संदसेत तीन कृषी विधेयके मंजूर करुन घेतली आहेत. या विधेयकावरुन वाद निर्माण झाला असून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी विरोधकांवर टीका केली आहे. काही लोक राजकीय स्वार्थासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना नेहमी खोटे बोलणारे काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी शेतकऱ्यांती दिशाभूल करण्याचं काम करतायत. हे लोक चुकीची माहिती पसरवत आहेत. शेतकऱ्यांना अशा कोणत्याही अफवांपासून वाचवणे हे भाजप कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आपल्याला शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल बनवायचं आहे, असं मोदी म्हणाले.

बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानावेळी विशेष...

शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही एक काम पूर्ण ताकदीने सुरु केले आहे. आता दशकानंतर शेतकऱ्यांना आपले उत्पादनाचे योग्य हक्क मिळू शकणार आहेत. कृषी क्षेत्रात ज्या सुधारणा करण्यात आल्या आहेत, त्याचा सर्वाधिक फायदा छोट्या शेतकऱ्यांना होणार आहे. यूपीए सरकारच्या 6 वर्षांच्या काळात किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 20 लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले. भाजप सरकारच्या 5 वर्षांच्या काळात 35 लाख कोटी रुपयांचे कर्ज किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देण्यात आले आहे. सरकारने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळावे यासाठी प्रयत्न केला आहे. त्यांना आता त्यांच्या शेतीसाठी अधिक सुलभतेने कर्ज मिळत आहे. यापूर्वी 5 हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यालाच किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून लाभ मिळायचा. आमच्या सरकारने आता याची मर्यादा वाढवून सर्व शेतकऱ्यांचा यात समावेश केला आहे, असं ते म्हणाले. 

गलवान संघर्षात फक्त 5 सैनिक मारले; चीनने पहिल्यांदाच सांगितली आकडेवारी

शेतकऱ्याला थेट बँकेशी जोडण्याचा प्रयत्न

शेतकऱ्यांना थेट बँकेशी जोडण्यासाठी गेल्या काही वर्षात प्रयत्न करण्यात आले आहेत. पीए शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून देशातील 10 करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख करोड रुपयांहून अधिक ट्रान्सफर करण्यात आले असल्याचा दावा मोदी यांनी केला. शेतकरी याआधी आपल्याच उत्पादनाला आपल्या मर्जीप्रमाणे विकू शकत नव्हता. त्यामुळे उत्पादन वाढूनही शेतकऱ्याचे उत्पन्न वाढसे नव्हते. उलट त्यांच्यावरील कर्ज वाढत गेले. नवीन कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांना आपला माल देशात इतर कोठेही विकता येईल, असं मोदी म्हणाले. 

स्वातंत्र्यानंतर अनेक दशके शेतकरी आणि कामगारांच्या नावे खूप घोषणा करण्यात आल्या. पण काळाने दाखवून दिले की, त्या सर्व गोष्ठी निरर्थक आणि विनाकामाच्या होत्या. देशाला हे कळून चूकले आहे. त्यामुळे गरीब, दलित, वंचित ,युवक, महिला, शेतकरी, आदिवासी, मजूर या सर्वांना हक्क देण्याचे महत्वाचे काम झाले असल्याचेही मोदी म्हणाले.