PM Narendra Modi | पुढील २५ वर्षांचं लक्ष्य ठरवण्याची हीच ती वेळ; मोदींचं भाजपाला आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi said, Our Ram is also incomplete without Nepal
पुढील २५ वर्षांचं लक्ष्य ठरवण्याची हीच ती वेळ; मोदींचं भाजपाला आवाहन

पुढील २५ वर्षांचं लक्ष्य ठरवण्याची हीच ती वेळ; मोदींचं भाजपाला आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयपूमध्ये आयोजित भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला आज संबोधित केलं. जगाच्या भारताकडून खूप अपेक्षा आहेत. तसंच देशातही भाजपाबद्दल लोकांच्या मनात विशेष प्रेमाची भावना आहे. देशातली जनता भाजपाकडे विश्वासाने, अपेक्षेने पाहत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपल्याला देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले आहेत. (PM Narendra Modi in BJP National Leader's meeting)

जयपूरमध्ये गुरुवारपासून भाजपाची तीन दिवसीय बैठक सुरू झाली आहे. या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi)दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हजेरी लावली. या बैठकीत यावर्षी गुजरात, हिमाचलमध्ये होणाऱ्या तसंच पुढच्या वर्षी अनेक राज्यात होणाऱ्या निवडणुका आणि २०२४ मधल्या लोकसभा निवडणुकांबद्दलची (Loksabha Elections in 2024) चर्चा होणार आहे. देशाच्या जनतेच्या आशा-आकांक्षांमुळे आपलं दायित्व अधिक वाढलं असल्याची भावनाही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: 2G च्या निराशेतून निघून भारताची 5G आणि 6G कडे वाटचाल : PM मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले, "देशातल्या जनतेचा आशा-आकांक्षांमुळे आपलं दायित्व अधिक वाढलं आहे. स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात देश पुढच्या २५ वर्षांचं लक्ष्य ठरवत आहेत. भाजपाचीही (Bhartiya Janata Party) पुढच्या २५ वर्षांचं लक्ष्य ठरवण्याची हीच ती वेळ आहे. देशातल्या लोकांच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करायच्या आहे. देशासमोर जी आव्हानं आहेत, ती देशातल्या जनतेसोबत राहून आपल्याला परतवून लावायची आहेत. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हाच आपला मंत्र आहे."

Web Title: Pm Narendra Modi Says Its Time For Bjp To Decide The Goal For Next 25 Years

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top