Modi Cabinet : नरेंद्र मोदींच्या शपथविधीला कुटुंबीयांपैकी कुणीच नाही; कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

As Prime Minister Narendra Modi takes oath, mother Heeraben Modi watches swearing-in ceremony

नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सुरू असताना मोदी यांच्या आई हिराबेन मोदी या टीव्हीवरून शपथविधी पाहून टाळ्या वाजवत होत्या.

Modi Cabinet : नरेंद्र मोदींच्या शपथविधीला कुटुंबीयांपैकी कुणीच नाही; कारण...

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. परंतु, या सोहळ्याला मोदींच्या कुटुंबीयांना आमंत्रण देण्यात आले नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित राहिला नाही.

नरेंद्र मोदी यांच्या शपविधी सोहळ्यासाठी देश-विदेशातील दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, या सोहळ्यासाठी मोदींच्या कुटुंबीयांना आमंत्रण देण्यात आले नसल्यामुळे शपथविधी सोहळ्याला कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित राहणार नाही, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहीण वसंतीबेन यांनी दिली. मोदी यांचा शपथविधी सुरू असताना मोदी यांच्या आई हिराबेन मोदी या टीव्हीवरून शपथविधी पाहून टाळ्या वाजवत होत्या. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना वसंतीबेन म्हणाल्या, 'नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला आमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले आहे. नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. त्यावेळी सुद्धा कुटुंबातील एकही व्यक्ती उपस्थित नव्हती. मी, भावाला राखी पाठवते. माझ्या भावाने सतत पुढे जावे. एक गरिबाचा मुलगा पुढे जावा, अशी माझ्या मनात नेहमीच भावना आहे. जनतेने त्यांना साथ दिली असून, भरभरून मते दिली आहेत. मी जनतेचे आभार मानते.'

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याच्या आमंत्रणामध्ये परदेशी पाहुणे, विविध देशांचे राजदूत, वाणिज्यदूत, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, संभाव्य मंत्र्यांचे नातेवाईक, वरिष्ठ सनदी अधिकारी यांचा समावेश आहे.

Web Title: Pm Narendra Modi Sister Vasantiben Oath Ceremony And Mother Heeraben Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top