मोदींनी घेतली मंत्रिमंडळाची बैठक, पण अशी...

वृत्तसंस्था
बुधवार, 25 मार्च 2020

मोदींनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येण्याचा संदेश दिला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी हा नियम पाळणे गरजेचा असल्याने त्यांनी 21 दिवसांसाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज (बुधवार) मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीतही सहभागी मंत्री ठराविक अंतरावर बसल्याचे पाहायला मिळाले.

मोदींनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येण्याचा संदेश दिला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी हा नियम पाळणे गरजेचा असल्याने त्यांनी 21 दिवसांसाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पॅकेजचीही घोषणा करण्यात आली आहे.

मोदींनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांच्या खुर्च्यांमध्ये ठराविक अंतर ठेवल्याचे दिसत आहे. मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह प्रमुख मंत्री सहभागी झाल्याचे दिसत होते. मोदींनी नागरिकांना केलेले आवाहन स्वतःही आमलात आणल्याचे दिसत होते. अमित शहा यांनीही या बैठकीचे छायाचित्र ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi Social distancing in cabinet meeting for coronavirus