PM मोदींचा सहकारी मंत्र्यांना 'लंच पे चर्चा'चा मंत्र; मागवला अहवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

PM मोदींचा सहकारी मंत्र्यांना 'लंच पे चर्चा'चा मंत्र; मागवला अहवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही महिन्यात सरकारी आधिकारी आणि मंत्र्यांना काही सुचना केल्या होत्या, या सर्व सुचना मंत्रालयातील कामाची गुणवत्ता वाढावी आणि कामाला जास्त वेळ लागू नये, कामे झटपट होण्यासाठी यासुचना होत्या, मोदी यांनी या सुचनांनुसार झालेल्या कामाचा रिपोर्ट मागवला आहे. त्यांना जाणून घ्यायच आहे की दिलेल्या सुचना आधिकारी आमलात आणत आहे का नाहीत.

पंतप्रधान मोदींनी त्यांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना सर्व सरकारी खरेदीसाठी GeM पोर्टल वापरण्यास सांगितले होते. आणि जेवताना बैठक घ्यायला देखील सांगितल होत, कारण जेवन करताना विचारांची देवान-घेवान होते. त्यामुळे काम करण्यासाठी उत्साह निर्माण होते. ते अस म्हणाले की केलेल्या कामाचा प्रचार आणि प्रसार करावा म्हणजे केलेली कामे लोकांन पर्यंत पोहचतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा त्यांच्या मंत्रिमंडळाला मंत्रालयांद्वारे सरकारच्या खरेदी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म- GeM पोर्टलद्वारे करण्यासाठी सांगितले. ते पुढे म्हणाले, प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्याच्या उद्देशाने या उपाययोजनांच्या अंमलबजावणी आणि प्रगतीबाबत आता मंत्रालयांकडून तपशील मागविण्यात आला आहे.

हेही वाचा: पैगंबरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; आमदार टी. राजा सिंह यांना भाजपनं केलं निलंबित

गेल्या वर्षी मोदी सरकारने तंत्रज्ञानावर आधारित संसाधने यांना चालना देण्यासाठी आणि आणि शासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी मंत्रिमंडळाची आठ गटात विभागणी करण्यात आली होती. मंत्र्याना आठ घटात विभागणीसाठी आभ्यास आणी विचारपुर्वक निर्णस घेतला होता. एकूण 5 सत्र आयोजित केले होते. ही वैयक्तिक कार्यक्षमता, केंद्रित अंमलबजावणी, मंत्रालयाचे कामकाज आणि भागधारकांचा सहभाग, पक्ष समन्वय आणि प्रभावी संवाद आणि संसदीय पद्धती होत्या.

Web Title: Pm Narendra Modi Sought Report Ministers Tiffin Meeting Use Gem

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..