संसदेतील चर्चांना हजर राहा : मोदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरेंद्र मोदी
संसदेतील चर्चांना हजर राहा

संसदेतील चर्चांना हजर राहा : मोदी

नवी दिल्ली : प्रथमच लोकसभा आणि राज्यसभेवर निवडून आलेले, तसेच नव्यानेच मंत्रिपदाची जबाबदारी मिळालेले मंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आज बैठक घेतली. या तिघांनी नवीन मंत्र्यांना संसदीय कामकाज पद्धतीचे महत्व समजावून सांगत सभागृहातील चर्चांना हजर राहण्यास सांगितले. विस्तारित मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधानांनी सर्वांशी संवाद साधला.

संसद अधिवेशनाच्या दरम्यान नियमित उपस्थित रहा आणि विशेषतः राज्यसभेतील चर्चा आवर्जून ऐका, असे पंतप्रधानांनी मंत्री आणि इतर सदस्यांना सांगितले. येत्या २९ नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. दोन्ही सभागृहांत कामकाज जेव्हा जेव्हा सुरळीत चालेल, तेव्हा तेथे हजर रहा, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. २०१४ पासून मोदी यांनी भाजप लोकप्रतीनिधींना हीच बाब अनेकदा सांगितली आहे.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

मध्यंतरी त्यांनी, लोकसभा व राज्यसभेत वारंवार दांडी मारणाऱ्या खासदारांची यादीही मागवून घेतली होती. त्यानंतरच्या टप्प्यात मोदींनी अधिवेशनाच्या तोंडावर सुषमा स्वराज भवनातील बैठकीत नवनियुक्त मंत्र्यांची ‘शिकवणी‘ घेतली. अधिवेशना दरम्यान संसदीय कामाची उत्पादकता वाढविण्यासाठी काय प्रयत्न करावेत हेही मोदी यांनी आवर्जून सांगितले.

loading image
go to top