संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणेची गरज; पंतप्रधान मोदींची आमसभेत स्पष्टोक्ती 

pm narendra modi speech united nation general assembly
pm narendra modi speech united nation general assembly

नवी दिल्ली (United Nations General Assembly)  : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज, संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेला संबोधित करत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी संबोधन केले. भारताला संयुक्त राष्ट्रांवर प्रचंड विश्वास आहे. भारता इतका विश्वास क्वचितच कोणी टाकला असले, असं मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं. त्याचवेळी संयुक्त राष्ट्रांमधील सुधारणांसाठी आग्रही असल्याचंही मोदींनी म्हटलंय. 

जगभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

  • संयुक्त राष्ट्रांकडून प्रभावशाली रिस्पॉन्स कुठं आहे?
  • कोरोना महामारीच्या संकटात संयुक्त राष्ट्रं कुठं आहे?
  • संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा ही काळाची गरज आहे.
  • भारत सुधारणांसाठी आग्रही राहील 
  • जगात तिसरं महायुद्ध झालं नाही, पण अनेक युद्धं झाली, गृहयुद्धं झाली. निष्पाप नागरिकांचे बळी गेले. त्यावेळी संयुक्त राष्ट्रं कुठं होती. 
  • भारताने कायम संपूर्ण मानव जातीचा विचार केला
  •  युएनचा संस्थापक सदस्य असल्याचा भारताला अभिमान आहे. जग 1945 पासून खूप बदललं आहे. सध्याच्या अडचणी खूप वेगळ्या आहेत. 

  •  आम्ही अशक्त होतो, तेव्हा जगाला त्रास दिला नाही. जेव्हा आम्ही सक्षम झालो, तेव्हा आम्ही जगावर ओझे झालो नाही. मग आणखी किती काळ आम्हाला वाट पाहावी लागेल? यूएन आणि भारताची तत्वे सारखीच आहेत. वसुधेव कुटुंबकमचा नारा यूएनमध्ये अनेकवेळा घुमला आहे.

  • भारताने नेहमीच जगाच्या कल्याणाची कामना केली आहे. भारताला यूएनमध्ये अधिक जबाबदारी निभावायची आहे. आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि योगा दिवस भारताने जगाला दिला आहे. 

  • कोरोना काळात भारतीय फार्मा कंपनींनी 150 पेक्षा अधिक देशांना मदत केली आहे. भारतात कोरोना लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. जगाला या महामारीतून बाहेर काढण्यासाठी भारत मदत करेल. आम्ही तिसऱ्या टप्प्यातील चाचणीकडे जात आहोत. आम्ही पायाभूत सुविधा वाढवत आहोत. 

  • जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या अनुभवाचा फायदा जगाला होईल. भारत नेहमीच जगाच्या शांती, सुरक्षा आणि समृद्धीसाठी कटीबद्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com