PM Modi Married Life : मोदींचं लग्न झालं, हे केव्हा कळालं? जशोदाबेन सोबत का राहत नाही? | Valentine Week 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Modi Married Life

PM Modi Married Life : मोदींचं लग्न झालं, हे केव्हा कळालं? जशोदाबेन सोबत का राहत नाही?

Valentine Week 2023: सध्या वॅलेंटाईन वीक सुरू आहे. यानिमित्त आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वैवाहीक आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत. कोणी म्हणतात मोदींनी कधीच लग्न केल नाही तर कोणी म्हणतात मोदीचं लग्न झालंय.

पण तुम्हाला माहिती आहे का जशोदाबेन नावाच्या व्यक्ती नरेंद्र मोदींना आपले पती मानतात. अनेकदा त्यांनी या मोदींविषयी असलेलं त्याचं प्रेम बोलून दाखवलं. काय आहे हे सर्व प्रकरण जाणून घेऊया. (pm narendra modi spouse wife jashodaben married life story valentine day special)

मोदींनी २००१, २००२, २००७ व २०१२ या वर्षी लढलेल्या सर्व विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांची `वैवाहिक स्थिती`चा कॉलम नेहमी रिकामाच सोडला होता. त्यामुळे ते अविवाहीत असल्याचं सर्वांच म्हणणं पडलं.

पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अर्ज भरताना मोदींनी स्वत: विवाहित असल्याचे शपथपत्र देत पत्नीच्या नावाच्या जागी जशोदाबेन यांचं नाव लिहले होते आणि एकच चर्चा रंगली

यावर जशोदाबेन म्हणाल्या होत्या, "मी जरी त्यांच्यासोबत राहत नसले तरी त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर आहे. माझे त्यांच्याशी लग्न झाले असून ते माझ्यासाठी राम आहेत."

नरेंद्र मोदी यांनी मात्र कधीच त्यांच्या विवाहीत आयुष्याविषयी उघडपणे सांगितले नाही.

मोदींच लग्न केव्हा झालं?

५४ वर्षांपूर्वी वयाच्या १७ व्या वर्षी मोदींचा जशोदाबेन यांच्याशी विवाह झाला होता. मात्र लग्नाच्या अवघ्या दोन आठवड्यांनंतरच ते वेगळे झाले. त्यानंतर मोदींनी अविवाहीत असल्याचंच सांगितलं

जशोदाबेन या निवृत्त शिक्षिका असून मोदींचे मूळ गाव असणा-या वाडनगरपासून ३५ किमी अंतरावरील ब्राह्मणवाडा गावातील शाळेत शिकवायच्या.