काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही, पण आज 'जय भीम म्हणण्यास भाग पाडलं'; PM मोदींची सडकून टीका

PM Narendra Modi Targets Congress : ‘‘काँग्रेसकडून ‘सबका साथ, सबका विकास’ची अपेक्षा करणे ही मोठी चूक असेल. कारण काँग्रेससाठी ‘कुटुंब प्रथम’ आहे."
PM Narendra Modi Targets Congress
PM Narendra Modi Targets Congressesakal
Updated on
Summary

पंडित नेहरू पंतप्रधान असताना राज्यघटनेत झालेल्या बदलांचा दाखला देत, पंतप्रधान मोदींनी नेहरूंच्या नेतृत्वाखालील सरकारचा स्टॉपगॅप (हंगामी) सरकार असा उल्लेख केला.

नवी दिल्ली : ‘‘आणीबाणीदरम्यान राज्यघटनेची मूळ भावना पायदळी तुडविण्यात आली होती, त्यामुळे ‘राज्यघटना’ हा शब्द काँग्रेसला (Congress) शोभणारा नाही. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिले नाही. परंतु आज काँग्रेसला ‘जय भीम’ (Jai Bheem) म्हणण्यास भाग पाडले आहे,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) काँग्रेसवर हल्लाबोल केला. राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com