Delhi-Mumbai Expressway : PM मोदी आज करणार पहिल्या सेक्शनचे लोकार्पण; जाणून घ्या खासियत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pm narendra modi to inaugurate part of delhi mumbai expressway sohna dausa section know its specialty marathi News

Delhi-Mumbai Expressway : PM मोदी आज करणार पहिल्या सेक्शनचे लोकार्पण; जाणून घ्या खासियत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या सोहना-दौसा या सेक्शनचे उद्घाटन करणार आहेत. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेचा 246 किमीचा दिल्ली-दौसा-लालसोट सेक्शन हा तब्बल 12,150 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. (pm narendra modi to inaugurate part of delhi mumbai expressway sohna dausa section)

या महामार्गाचा हा सेक्शन सुरू झाल्यामुळे दिल्ली ते जयपूर प्रवासाचा वेळ 5 तासांवरून 3.5 तासांवर येईल. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेमुळे अनेक क्षेत्रांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. चला जाणून घेऊया या एक्स्प्रेस वेची खासियत..

ही असेल दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे ची खासियत

1. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे 1,386 किमी लांबीसह भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे असणार आहे.

2. सोहना (हरियाणा)-दौसा (राजस्थान) सेक्शन हा नवी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे मार्गाचा पहिला टप्पा आहे.

3. हा महामार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून जाईल.

4. हा महामार्ग कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सुरत या प्रमुख शहरांना देखील जोडेल.

5. या एक्स्प्रेसवेमुळे दिल्ली आणि मुंबई दरम्यानचे प्रवासाचे अंतर 1,424 किमीवरून 1,242 किमीपर्यंत 12% कमी होईल.

6. दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ 24 तासांवरून 50% कमी करून 12 तासांवर येईल.

7. हा आठ लेनचा एक्स्प्रेस वे आहे, जो 12 लेनपर्यंत सहज वाढवता येईल.

8. एक्सप्रेसवे 93 पीएम गति शक्ती आर्थिक नोड्स, 13 बंदरे, 8 प्रमुख विमानतळ आणि 8 मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क (MMLP) देखील सेवा देतील.

9. 'भारतमाला प्रकल्प'च्या पहिल्या टप्प्याचा एक भाग म्हणून हा एक्सप्रेसवे बांधला जात आहे.

10. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे मार्च 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Narendra Modi