वेळीच टाळेबंदी केल्याने लाखो जीव वाचले- मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जून 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारतीयांशी संवाद साधला. भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेली स्फोटक परिस्थिती आणि कोरोनाबाधित रुग्णांची दिवसागणिक वाढणारी संख्या या पार्श्वभूमीवर मोदी आज काय बोलतील याकडे देशाचं लक्ष लागलं होतं.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीयांशी संवाद साधला. भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेली स्फोटक परिस्थिती आणि कोरोनाबाधित रुग्णांची दिवसागणिक वाढणारी संख्या या पार्श्वभूमीवर मोदी आज काय बोलतील याकडे देशाचं लक्ष लागलं होतं. कोरोनाचे संकट निर्माण झाल्यापासून मोदी यांनी आज सहाव्यांदा जनतेशी संवाद साधला. यावेळी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी टाळेबंदी वेळीच लागू केल्याने मोठा अनर्थ टळल्याचा दावा केला आहे.  वेळीच टाळेबंदी लागू केल्याने लाखो लोकांचे जीव वाचले असं ते म्हणाले आहेत.

भारत आता अनलॉक-2 मध्ये प्रवेश करत आहे. या संदर्भातील मार्गदर्शन तत्वे सरकारकडून सोमवारी रात्री जारी करण्यात आले आहेत. यावेळी मोदी चीन संदर्भात काही भाष्य करतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी या विषयी बोलण्याचे टाळले आहे. 

पंतप्रधान मोदींच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे

-वेळीच टाळेबंदी केल्याने लाखो जीव वाचले

-अनलॉक 1 सुरु झाल्यापासून नागरिकांचा बेजबाबदारपणा वाढला

-80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य पुरवढा केला

-देशात एकही नागरिक उपाशी पोटी झोपला नाही पाहिजे

- गेल्या तीन महिन्यात 20 कोटी नागरिकांच्या खात्यात 31 हजार कोटी जमा केले

-5 किलो गहु किंवा तांदूळ मोफत देणार, 1 किलो दाळही नोव्हेंबरपर्यंत देणार

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi today speake on this issue