Lal Krishna Advani Atal Bihari Bajpayee Watch Raj Kapoor Film : महान अभिनेता आणि दिग्दर्शक राज कपूर यांची आज १००वी जयंती आहे. कपूर कुटुंब त्यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी रणबीर कपूर, आलिया भट्ट, करिष्मा कपूर, करीना कपूर, सैफ अली खानसह कपूर परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते.
या भेटीदरम्यान कपूर कुटुंबियांनी राज कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनीही राज कपूर यांच्या चित्रपटाशी संबंधित लालकृष्ण आडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा एक किस्साही सांगितला.