ओमिक्रॉनची भीती! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा UAE दौरा पुढे ढकलला

एप्रिल-मे दरम्यान आलेल्या डेल्टा स्ट्रेनमुळे जगभरात कोरोनाची दुसरी लाट आली होती.
PM Modi's UAE visit postponed
PM Modi's UAE visit postponed sakal

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या (Coroana Virus) अत्यंत संसर्गजन्य ओमिक्रॉनच्या (Omicron Count In India) रूग्णांमध्ये जगभरात वाढ होत आहे. दरम्यान, 6 जानेवारी रोजी नियोजित असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Visit To UAE) यांचा संयुक्त अरब अमिराती (UAE) चा नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. पंतप्रधान ६ जानेवारीला आखाती राष्ट्राला भेट देणार होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 2022 मधील त्यांची ही पहिलीच विदेश यात्रा होती. (Prime Minister Narendra Modi Visit To UAE Postponed. )

दोन्ही देश त्यांच्या राजनैतिक संबंधांची 50 वर्षे साजरा करणार आहे, त्यादृष्टीने धोरणात्मकदृष्ट्या हा दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, वाढत्या कोरोनाच्या रूग्णांमुळे मोदींचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. डेल्टा स्ट्रेन पेक्षा जास्त संक्रमणक्षम असलेल्या कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे संपूर्ण भारत आणि जगभर चिंता निर्माण झाली आहे.

PM Modi's UAE visit postponed
वाढती रूग्णसंख्या तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते - आदित्य ठाकरे

डेल्टामुळे आली होती दुसरी लाट

एप्रिल-मे दरम्यान आलेल्या डेल्टा स्ट्रेनमुळे (Delta Strain) जगभरात कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) आली होती. यामुळे अनेक राज्यांमधील आरोग्या यंत्रणेवर परिणाम झाला होता, तसेच नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. दरम्यान, दक्षिण अफ्रिकेत आढळून आलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रूग्णांची संख्या जवळपास 800 च्या घरात नोंदविली गेली आहेत. (Omicron Cases In India)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com