Free Aadhaar Update : आधार अपडेट ते आयटीआर भरण्यापर्यंत... मोफत होतील ही सगळी कामं! जाणून घ्या डेडलाईन

जर तुमचं आधार कार्ड दहा वर्षांपेक्षा अधिक जुनं असेल, तर ते अपडेट करणं गरजेचं आहे. सध्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही.
Money Deadline 2024
Money Deadline 2024eSakal

Money Deadline : आधार अपडेट करणे, आयटीआर भरणे, डीमॅट अकाउंट नॉमिनेशन अशी कामं आता आपल्याला मोफत करता येणार आहेत. मोदी सरकारने यासाठीची डेडलाईन वाढवली आहे. त्यानंतर मात्र या कामांसाठी पेनल्टी किंवा अन्य चार्जेस द्यावे लागणार आहेत. ही सात कामं कोणती आहेत, आणि त्यासाठीची अंतिम मुदत काय आहे.. जाणून घेऊयात.

आधार अपडेट

जर तुमचं आधार कार्ड दहा वर्षांपेक्षा अधिक जुनं असेल, तर ते अपडेट करणं गरजेचं आहे. सध्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. myAadhaar या पोर्टलवर जाऊन तुम्ही मोफत आधार अपडेट करू शकता. यासोबतच, CSC केंद्रावर जाऊनही तुम्ही आपलं आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता. यासाठीची अंतिम मुदत 14 मार्च 2024 आहे. त्यानंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शुक्ल आकारले जाऊ शकते.

घर भाड्यावरील TDS

जर तुम्ही 50 हजार रुपये किंवा त्याहून अधिक घरभाडे (मासिक) भरत असाल, आणि 2023-24 या आर्थिक वर्षात TDS भरला नसेल; तर मार्च 2024 मध्ये रेंट भरून TDS भरुन घ्या. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

टॅक्स सेव्हिंग प्लॅन

तुम्ही जर 2023-24 या वर्षासाठी टॅक्स सेव्हिंग प्लॅनची तयारी करत असाल, तर सर्व टॅक्स सेव्हिंग गुंतवणुकीची माहिती 31 मार्च 2024 पूर्वी भरून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर कदाचित हे भरण्यासाठी दंड भरावा लागू शकतो.

Money Deadline 2024
New Tax Slabs : नवीन कर स्लॅबमध्ये 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर भरावा लागणार नाही कर; जाणून घ्या कोणते बदल होणार?

बँक एफडी

कित्येक बँकांनी सध्या नवीन स्पेशल फिक्स डिपॉझिट योजना लाँच केल्या आहेत. या योजनांची डेडलाईन देखील संपत आली आहे. HDFC सीनियर सिटीझन केअर FD ची डेडलाईन 10 जानेवारी आहे. तर SBI च्या WeCare FD ची डेडलाईन 31 मार्च 2024 आहे.

डीमॅट अकाउंट

तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल, तर Demat Account Nomination भरण्याची अंतिम मुदत लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या डीमॅट अकाउंटला नॉमिनी जोडण्याची अंतिम तारीख 30 जून 2024 आहे. हे न केल्यास पुढे ट्रेडिंग करता येणार नाही.

आयटीआर

2023-24 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2024 आहे. त्यासाठीचे फॉर्म यापूर्वीच जारी करण्यात आले आहेत. जुलैनंतर आयटीआर भरण्यासाठी दंड आकारला जाऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com