PM Vaccine Centres Visit Live : PM मोदी 'भारत बायोटेक'मध्ये दाखल; पुढील पुणे दौऱ्यात बदल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 November 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोना विषाणूवर भारतात विकसित केल्या जाणाऱ्या तीन लशींच्या कंपन्यांना भेट देणार आहेत.

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोना विषाणूवर भारतात विकसित केल्या जाणाऱ्या तीन लशींच्या कंपन्यांना भेट देणार आहेत. लशीचा विकास आणि तिच्या  निर्मितीची प्रक्रिया याबाबतची माहिती ते घेणार आहेत. यामध्ये ते अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्क, हैद्राबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देणार आहेत. मोदींच्या या दौऱ्याचे लाईव्ह अपडेट्स...

अपडेट्स :

- पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जाणार आहेत.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणामधील हैदराबाद येथे असलेल्या भारत बायोटेकच्या स्वदेशी कोरोना लशीविषयी माहिती घेतली. ते म्हणाले, "आतापर्यंत कोरोना लशीच्या चाचण्यांमध्ये वैज्ञानिकांनी केलेल्या प्रगतीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांची टीम जलद प्रगतीसाठी आयसीएमआरबरोबर काम करत आहे." 

- पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमधून तेलंगणाला पोहोचले आहेत. हैद्राबादमधील भारत बायोटेक या लसनिर्मिती करणाऱ्या कंपनीला भेट देऊन ते या प्रक्रियेबाबतचा आढावा घेणार आहेत. 

आधीच्या वेळापत्रकानुसार दुपारी 1 ते 2 या वेळात सीरम इन्स्टिट्युटमध्ये येणार होते, मात्र काही कारणास्तव दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. नव्या वेळापत्रकानुसार मोदी दुपारी 3:50 ला पुणे विमानतळावर येणार आहेत . त्यानंतर 3:55 वाजता हेलिकॉप्टरने मांजरीकडे रवाना होतील. हेलीपॅडमधून 4:15 वाजता सीरममध्ये जातील.

- 'झायडस कॅडिला' यांनी विकसित केलेल्या देशी डीएनए आधारित लसीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कला भेट दिली. त्यांनी केलेल्या या विशेष कार्यासाठी मी त्यांची प्रशंसा केली. या लसनिर्मितीच्या प्रयत्नामध्ये त्यांच्या मागे उभे राहण्याचे काम भारत सरकार सक्रियपणे करत आहे. - पंतप्रधान नरेंद्र मोदी

- PM मोदींनी अहमदाबादमध्ये झायडस  बायोटेक पार्कबाहेर जमलेल्या गर्दीला अभिवादन केले.

- व्हिडीओ : पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्कमध्ये आहेत. ते कोरोना विषाणूवरील ZyCOV-D या लशीसंदर्भात माहिती घेत आहेत. 

- पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्कमध्ये पोहोचले आहेत. ते इथे लशीच्या निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेणार आहेत. यानंतर ते पुण्यातील सिरम इन्स्टिटूयट आणि हैद्राबादमधील भारत बायोटेकला भेट देतील. 

- गुजरात : पंतप्रधान मोदी आज आपल्या  दौऱ्यात अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्कला भेट देत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी केलेल्या तयारीची ही काही दृष्ये...

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM narendra modi Vaccine Visit Live Pune Ahmedabad Hyderabad corona virus vaccine india