
मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयाचे छायाचित्र आरोपींनी ‘ओएलएक्स’वर प्रसिद्ध केले असून ते विक्रीची जाहिरात गुरुवारी (ता.१७) केली. याबाबत पोलिसांनाही काल सायंकाळपर्यंत याची काही कल्पना नव्हती.
वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसी येथील कार्यालय ‘विकणे’ आहे, अशी खोडसाळ जाहिरात ओएलक्स या ऑनलाइन खरेदी-विक्री पोर्टलवर करणाऱ्या चार जणांनी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या कार्यालयाची किंमत साडेसात कोटी रुपये ठेवण्यात आली होती.
आणखी वाचा : रेल्वे सेवेबाबत अनिश्चितता कायम;प्रवासी वाहतूक नसल्याने उत्पन्न घटले
मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयाचे छायाचित्र आरोपींनी ‘ओएलएक्स’वर प्रसिद्ध केले असून ते विक्रीची जाहिरात गुरुवारी (ता.१७) केली. याबाबत पोलिसांनाही काल सायंकाळपर्यंत याची काही कल्पना नव्हती. हे कार्यालय वाराणसीतील जवाहरनगर परिसरात आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल केला आहे. ज्याने कार्यालयाचे छायाचित्र काढले आणि ते ‘ओएलएक्स’वर टाकणाऱ्या व्यक्तीसह चारजणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे वाराणासीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अमित पाठक म्हणाले. ही जाहिरात काल व्हायरल होऊ लागल्यानंतर ती तातडीने ‘ओएलएक्स’वरुन ती हटविण्यात आली.
आणखी वाचा : कोरोनाची लस कधी आणि कोठे मिळणार? आरोग्य मंत्रालयानं दिली उत्तरे
जाहिरातीतील वैशिष्ट्ये
- हाउसेस अँड व्हिला, चार बेडरूमसह.
- बिल्डअप एरिया ६,५०० वर्ग फूट
- दोन मजली इमारत दोन कार पार्किंगबरोबर ईशान्यकडे मुख.
- विक्रेत्याचे नाव लक्ष्मीकांत ओझा.
- प्रकल्पाचे नाव ‘पीएमओ कार्यालय, वाराणसी’.
- किंमत सातेसात कोटी रुपये
- जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर फोन केला तो कोणीही उचलला नाही.
आणखी वाचा : PM मोदींनी शेतकऱ्यांसमोर जोडले हात; म्हणाले, 'तुमच्यासमोर नतमस्तक...