PM मोदींनी 'अक्षय पात्र किचन'चं केलं उद्घाटन; एक लाख मुलांसाठी बनवता येणार अन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi Varanasi Visit

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत.

PM मोदींनी 'अक्षय पात्र किचन'चं केलं उद्घाटन; एक लाख मुलांसाठी बनवता येणार अन्न

PM Modi Varanasi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. या भेटीत पंतप्रधानांनी 'अक्षय पात्र किचन'चं (Akshaya Patra Kitchen) उद्घाटन केलं. अक्षय पात्र किचनचं उद्घाटन केल्यानंतर, पीएम मोदी एलटी कॉलेजमधून रुद्राक्ष कन्व्हेन्शनल सेंटरसाठी रवाना झाले.

वाराणसीत तयार करण्यात आलेल्या अक्षय पात्र किचनमध्ये एक लाख मुलांसाठी माध्यान्ह भोजन तयार केलं जाणार आहे. शिवाय, अक्षय पात्र किचनमध्ये अनेक आधुनिक मशीन्स बसवण्यात आल्या आहेत. या किचनमध्ये बसवण्यात आलेलं रोटी मेकिंग मशीन अवघ्या एका तासांत 40 हजार रोट्या तयार करेल.

हेही वाचा: मुकेश अंबानींची मुलगी ईशा घेणार रिलायन्स रिटेलची जबाबदारी!

तसंच 15 हजार स्क्वेअर मीटरमध्ये बनवलेलं अक्षय पात्राचं स्वयंपाकघर बनवण्यासाठी 24 कोटी रुपये खर्च आलाय. स्वयंपाकघरात रोटी बनवण्याचं मशीन आहे. यामध्ये पीठ आपोआप मळूनही घेता येऊ शकतं. दरम्यान, 8 जुलै रोजी अक्षय पात्र किचन 25 हजार मुलांसाठी अन्न देण्यास सुरुवात करेल. 6 महिन्यांनंतर एक लाख मुलांसाठी अन्न तयार केलं जाईल. अक्षय पात्र फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष भरत दास यांनी सांगितलं की, पहिल्या टप्प्यात सेवापुरीतील शाळांमध्ये जेवण पोहोचवलं जाणार आहे. या गटात 143 शाळा असून त्यापैकी 124 परिषद आणि 19 अनुदानित आहेत.

Web Title: Pm Narendra Modi Varanasi Visit Latest News And Update Akshaya Patra Kitchen

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..