PM मोदी 11 वाजता करणार स्पेस असोसिएशनचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी काही उद्योजकांशी चर्चा करणार आहेत.
Narendra Modi
Narendra Modisakal

देशातील अंतराळ उद्योगाला चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी 11 वाजता इंडियन स्पेस असोसिएशन (ISPA) लाँच करणार आहेत. व्हर्च्युअली होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान अंतराळ क्षेत्रातील काही प्रमुख उद्योजकांशी संवाद देखील साधणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेतून इंडियन स्पेस असोसिएशन भारताला स्वावलंबी, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि अंतराळ क्षेत्रातील आघाडीचा देश बनविण्यात मदत करेल."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटरवरून देखील ही माहिती देण्यात आली आहे. "11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता, आपण भारतीय अंतराळ संघाच्या उद्घाटन कार्यक्रमात सामील होणार असून, या क्षेत्रातील प्रमुख भागधारकांशी संवाद साधणार आहे. ही संधी मिळाल्याचा आपल्याला आनंद आहे. ज्यांना अंतराळ आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांत रस आहे, त्यांनी हा कार्यक्रम पाहिला पाहिजे. " अशी माहिती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com