CAA वर पंतप्रधान मोदी काय बोलणार? संपूर्ण देशाचे लक्ष

वृत्तसंस्था
रविवार, 22 डिसेंबर 2019

सीएएच्या समर्थनार्थ मोहीम राबविणार

- 3 कोटी कुटुंबाशी साधणार संपर्क

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा दिल्लीच्या रामलीला मैदानावर आज (रविवार) होत आहे. यामध्ये ते नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) या कायद्याबाबत प्रथमच जाहीर भाष्य करतील व एक अत्यंत महत्त्वाची घोषणाही ते करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता त्यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) हा अल्पसंख्याकांच्या विरोधात कसा नाही, याची वातावरणनिर्मिती करण्यासाठी सत्तारूढ भाजपने देशभरातील केडरला कामाला लावले असून, प्रत्येक जिल्ह्यात या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी नेत्यांच्या पत्रकार परिषदा व सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी दहा दिवसांची विशेष जगजागरण मोहीम राबविली जाणार असून, त्यात भाजप नेते तीन कोटी कुटुंबांची भेट घेऊन या कायद्याची माहिती देतील.

सीएएच्या समर्थनार्थ मोहीम राबविणार

भाजपने या कायद्याच्या समर्थनार्थ देशव्यापी जगजागरण मोहीम आगामी दहा दिवसांत आक्रमकपणे राबविण्याचे ठरविले आहे. पक्षाचे सारे केंद्रीय मंत्री, खासदार, मुख्यमंत्री, आमदार व सारे लोकप्रतिनिधी देशभरात किमान 250 पत्रकार परिषदा घेतील.

3 कोटी कुटुंबाशी साधणार संपर्क

किमान तीन कोटी कुटुंबांशी संपर्क साधून त्यांना या कायद्याचे लाभ व याआडून हिंसाचाराला उत्तेजन देण्याचे विरोधकांचे कारस्थान याबाबत समजावून सांगण्यात येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi will talk about CAA