तेव्हाचा विद्यार्थी, आज लष्करात आधिकारी; PM मोदींसोबत 21 वर्षांनंतर पुन्हा भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pm narendra modis emotional meeting with army officer after 21 years

तेव्हाचा विद्यार्थी, आज लष्करात आधिकारी; PM मोदींसोबत 21 वर्षांनंतर पुन्हा भेट

दरवर्षीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी देखील कारगिलमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधान मोदी आज सकाळीच कारगिलला पोहोचले. कारगिलमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सशस्त्र दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली आणि जवानांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान मोदींनी 21 वर्षांनंतर एका लष्करी अधिकाऱ्याची भेट घेतली. योगायोग असा की 21 वर्षांपूर्वी जेव्हा दोघे भेटले तेव्हा पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि लष्करी अधिकारी सैनिक शाळेत शिकत होते.

21 वर्षांनंतर जेव्हा दोघे भेटले तेव्हा एक भावनिक क्षण समोर आला आला. 21 वर्षांपूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सैनिक शाळेत विद्यार्थ्यांचा सत्कार केला होता, तेव्हाचा फोटोही लष्कराच्या अधिकाऱ्याने पंतप्रधान मोदींना दाखवला. लष्कराच्या अधिकाऱ्याने त्या जुन्या छायाचित्रासह पीएम मोदींसोबत फोटो काढला आहे. 21 वर्षांनंतर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले असून एक शाळकरी विद्यार्थी लष्कराचा अधिकारी झाला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेजर अमित यांनी गुजरातमधील बालाचडी येथील सैनिक स्कूलमध्ये मोदींची भेट घेतली होती. राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेचच ऑक्टोबरमध्ये मोदी त्या शाळेत गेले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आज कारगिलमध्ये दोघे पुन्हा एकमेकांना भेटले तेव्हा ही खूप भावनिक भेट होती. चित्रात अमित आणि दुसरा विद्यार्थी पीएम मोदींकडून ढाल घेताना दिसत आहेत. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून दरवर्षी सशस्त्र दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. यावर्षी देखील प्रथेनुसार मोदींनी आज कारगिलमध्ये सैनिकांसोबत दिवाळीचा सण साजरा केला.

हेही वाचा: Rishi Sunak : वर्तुळ पूर्ण! दीडशे वर्षे राज्य अन् आता ब्रिटनची धुरा भारतीय वंशाच्या हाती

दरम्यान कारगिलमधील जवानांना संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, आम्ही युद्धाला पहिला पर्याय मानत नाही तर नेहमीच शेवटचा पर्याय मानतो आणि शांततेवर विश्वास ठेवतो. आमचा शांततेवर विश्वास आहे, पण शक्तीशिवाय शांतता शक्य नाही. पंतप्रधान म्हणाले की जेव्हा जेव्हा भारताची ताकद वाढते तेव्हा जागतिक शांतता आणि समृद्धीची शक्यता वाढते. देशाच्या सुरक्षेसाठी स्वावलंबी भारत अत्यंत महत्त्वाचा आहे आणि परकीय शस्त्रे आणि यंत्रणांवरील आपले अवलंबित्व कमीत कमी असले पाहिजे.

हेही वाचा: Car Buying Tips: पुढच्या महिन्यात लॉंच होतायत CNG, SUV अन् इलेक्ट्रिकसह 'या' ५ गाड्या