...हा तर मोदींचा पराक्रम : स्मृती इराणी

वृत्तसंस्था
शनिवार, 2 मार्च 2019

पाकिस्तानमधून दोन दिवसांत अभिनंदन यांना परत आणण्यामागे मोदींचा पराक्रम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकाने केलेल्या पराक्रमामुळे भारताचा सुपुत्र 48 तासांत परत आल्याने संघाला अभिमान वाटला असेल.

नवी दिल्ली : भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारतात पुन्हा परत आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराक्रम असल्याचे, वक्तव्य केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे.

भारतमातेचे वायुसेनानी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मातृभूमीवर पाऊल ठेवले अन्‌ देशात एकच जल्लोष झाला. आपल्या लाडक्‍या सैनिकाची सुखरूप सुटका व्हावी म्हणून मागील दोन दिवसांपासून मंदिर, मशीद, चर्च अन्‌ गुरुद्वारांमध्ये देवाचा धावा करणाऱ्या जनसागराने देशभर फटाके फुटले, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अवघा देश 'अभिनंदन'मय झाल्याचे पाहायला मिळाले. देशभरातील नेत्यांनी त्यांचे पुन्हा भारतात स्वागत केले. पण, आता याचे राजकारण करण्यात येत असल्याचे दिसत आहे. स्मृती इराणी यांनी यामागे मोदींचा पराक्रम असल्याचे म्हटले आहे.

स्मृती इराणी म्हणाल्या, की पाकिस्तानमधून दोन दिवसांत अभिनंदन यांना परत आणण्यामागे मोदींचा पराक्रम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकाने केलेल्या पराक्रमामुळे भारताचा सुपुत्र 48 तासांत परत आल्याने संघाला अभिमान वाटला असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modis parakram behind IAF pilots return says Smriti Irani