'काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही मोदींचं काहीच वाकडं करु शकत नाही'; राजू श्रीवास्तवचा संताप I PM Security Breach | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Srivastava

आपल्या पंतप्रधानांना अपमानित का करत आहात? तुमची बुद्धी भ्रष्ट झालीय का?

'काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही मोदींचं काहीच वाकडं करु शकत नाही'

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे बुधवारी पंजाब (Punjab) दौऱ्यावर होते. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणारं होतं. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी (CM CharanjitSingh Channi) हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी त्रुटी आढळली. पंतप्रधान मोदी यांचा ताफ्या ज्या मार्गावरुन जाणार होतो. त्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक असल्याचं दिसून आलं. त्यामुळं पंतप्रधान मोदी सुमारे 20 मिनिटं आपल्या गाडीतच बसून होते. त्यानंतर मोदींनी आपला पंजाब दौरा रद्द केल्याचं सांगण्यात आलं.

पंतप्रधान मोदी बुधवारी पंजाब दौऱ्यावर गेलेले असताना त्यांच्या सुरक्षेत काही गंभीर त्रुटी आढळून आल्या. या प्रकारामुळं पंजाब सरकारवर सर्वच स्तरातून जोरदार टीका होत आहे. पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर कॉमेडियन राजू श्रीवास्तवनं व्हिडिओ शेअर करत कॉंग्रेसवर संताप व्यक्त केलाय. राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे त्याचे मत मांडताना दिसतो. आता राजूनं व्हिडिओ शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधत टीका केलीय.

‘नेहमी लक्षात ठेवा, जंगलातला वाघ एकदा जखमी झाला की संपूर्ण जंगल शांत होऊन जातं. अरे कॉंग्रेसवाल्यांनो, तुम्ही मोदीजींचं काहीच वाकडं करु शकत नाही. कारण, मोदीजींवर गुरुनानक देव, बाबा केदारनाथ, बाबा विश्वनाथ, बाबा महाकाल यांचा आशीर्वाद आहे. नकली शेतकऱ्यांना पुढं करुन पंजाबची बदनामी का करता? आपल्या पंतप्रधानांना अपमानित का करत आहात? तुमची बुद्धी भ्रष्ट झालीय का’ असं व्हिडिओत राजू बोलताना दिसतोय. फिरोजपुरातील (Ferozepur) सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला, त्यामुळं मोदी हे भटिंडामधील (Bhatinda) पुलावर 15 मिनिटं अडकून पडले होते. अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचं पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. या प्रकारामुळं पंजाब सरकारविरोधात (Punjab Government) रोष वाढताना दिसतोय.

हेही वाचा: वाघानं प्रणयक्रीडेत अडथळा ठरणाऱ्या बछड्याचा काढला काटा

Web Title: Pm Security Breach Raju Srivastava Criticism Of Congress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PunjabNarendra Modi
go to top